१४७ गुंतवणूकदारांना गंडा घालून एका वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

१४७ गुंतवणूकदारांना गंडा घालून एका वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

मुंबईतील १४७ गुंतवणूकदारांना जी. व्ही. आर. एक्सपोर्टस् अॅण्ड इम्पोर्टस् या कंपनीच्या उद्योगामध्ये मुदत ठेवीच्या रक्कमेवर ७ ते १० टक्के व्याजासह परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण १७ कोटी ९४ लाख ७५ हजार स्विकारुन त्यांना व्याजाचा परतावा तसेच मुळ रक्कम परत न करता विश्वासघात करुन गुंतविलेल्या कोट्यवधींची रक्कम लंपास केली होती. याप्रकरणात गेल्या वर्षी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. १ वर्षापासून फरार असणारा आरोपी वेंकटरमनन गौपालन यास तिरुपती येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी दिली आहे.

मे. जी. बी. आर. एक्सपोर्टस् अॅण्ड इम्पोर्टस् या कंपनीचा प्रोप्रायटर वेकटरमनन गोपालन ( वय-५६ वर्षे) हा  चेन्नई, तामिळनाडू येथे राहत असून त्याचा  कंपनीचा उद्योग चेन्नई येथे आहे. शेतमालाची आयात आणि निर्मात करण्याचा उद्योग असल्याची बतावणी केली उद्योगाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर कंपनीमध्ये गुंतवणुक आवश्यक होती आणि या  गुंतवणुकीवर मुदत देवी रक्कमेवर मासिक ७ ते १० टक्के व्याजासह परतावा देण्याच्या योजना आखून गुतवणुकदारांना गुंतवणुकीवर मोठ्या रक्कमेच्या परताव्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणुक करण्यास भाग पाडले. गोपालन याने अनेक वृत्तपत्रांद्वारे जाहिरात देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित केले होते.

डिसेंबर २०२१ ते  मार्च २०२३ या कालावधीमध्ये फिर्यादीसह इतर १४६ गुंतवणूकदारांना अटक आरोपी वेकटरमनन गोपालन याने जी. व्ही. आर. एक्सपोर्टस अॅण्ड इम्पोर्टस् कंपनीचे मुंबईत सांताक्रूझ  येथे भाडयाने कार्यालय उपडले आणि कंपनीच्या उद्योगामध्ये विविध कालावधीच्या मुदत ठेवीच्या रक्कमेवर ७ ते १० टक्के मासिक व्याजासह परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी व साक्षिदारांकडून एकूण १७ कोटी ९४ लाख ७५ हजार स्विकारले.  व्याजासह मुळ रक्कम परत न करता, विश्वासघात करुन गुंतविलेल्या रक्कमेचा अपहार करुन फसवणूक करून पळून गेला म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी

वेकटरमनन गोपालन याच्या विरुध्द ७ जुलै रोजी भारतीय दंड संविधान कलम ४०९, ४२० सह एमपीआयडी कायदा कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल केला. हा  गुन्हा केल्यानंतर गेल्या एक वर्षापासून आरोपी फरार होऊन स्वतःचे  अस्तित्व लपविण्यासाठी वास्तव्याचे ठिकाण वारंवार बदलत होता. त्यामुळे आरोपीस अटक करणे पोलिसांना जिकरीचे झाले होते. अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपीला तिरुपती येथून ३ जुलैला अटक केली.

हे ही वाचा:

पुण्यात महिला वाहतूक पोलीसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

‘सनातन’वरील पुस्तक शुभशकून ठरला!

तामिळनाडू बसपाच्या प्रदेशाध्यक्षांची धारदार शस्त्राने हत्या

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना क्लीनचीट

आर्थिक गुन्हे कक्ष-१४ विभागातील तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक  संजय लोंढे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम, पोलीस हवालदार नलावडे व पोलीस हवालदार आव्हाड यांच्या पथकाने तिरूपती, आंध्र प्रदेश येथे २ ते ३ दिवस सापळा रचून अत्यंत शिताफिने गुन्ह्यातील आरोपी  वेंकटरमनन गोपालन याला अटक केली. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपी पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून तपासी अधिकारी हे गुन्हयातील गुंतवणुकदाराची गुतवणुकीच्या रक्कमेचा विनियोग कशा प्रकारे केला आणि आरोपीच्या साथीदारांचा सखोल तपास करीत आहेत.  गुंतवणुकदारांची गुंतवणुकीची रक्कम हस्तगत करण्याच्या दृष्टीने तपास चालू आहे.

Exit mobile version