त्याने न्यायाधीशांकडे लोखंडी बासरीच फेकून मारली अन्…

त्याने न्यायाधीशांकडे लोखंडी बासरीच फेकून मारली अन्…

दिंडोशी येथील मुंबई सत्र न्यायालयाने न्यायाधीशाकडे लोखंडी बासरी फेकणाऱ्या व्यक्तीला ५ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी ओंकारनाथ पांडे सत्र न्यायाधीशांकडे लोखंडी बासरी फेकल्याप्रकरणी दोषी आढळला.

पांडेवर भारतीय दंड संहितेअंतर्गत कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी एखाद्या सार्वजनिक सेवकाला स्वेच्छेने दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. कोविड साथीच्या आजारामुळे पांडेला सुरुवातीला न्यायालयात हजर करण्यात आले नाही. पांडेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय के मोरे यांच्यासमोर हजर करण्यात आले.

आरोपी पांडेने न्यायालयासमोर सांगितले की, त्याच्या लहान भावाची हत्या करण्यात आली आहे, ज्यामुळे तो तणावाखाली होता. त्याने कोर्टाकडे अपील केले की, त्याला चूक लक्षात आली आहे. परंतु सत्र न्यायालयाने मात्र त्याचा अपील अर्ज फेटाळला आणि शिक्षा शिथिल करण्यास नकार दिला.

 

कोर्टाने म्हटले आहे की, गुन्हा कोर्टाच्या खोलीत घडला आहे. त्यामुळेच हे स्पष्ट आहे की, आरोपीचा हेतू न्यायाधीशांवर हल्ला करणे आणि त्याला कर्तव्य बजावण्यापासून रोखणे हा होता. पांडेला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच पांडेला ६००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे, त्यापैकी ५००० रुपये जखमी झालेल्या स्टेनोग्राफरला दिले जातील. असा आरोप आहे की, सकाळी ११.१५ च्या सुमारास वकिलाचा काळा कोट परिधान करून पांडे कोर्ट रूम १० मध्ये घुसले आणि मोठ्याने ओरडू लागले. त्याचवेळी, न्यायाधीशांच्या दिशेने फेकलेल्या बासरीने स्टेनोग्राफर श्रेया विचारेच्या पाठीवर आदळल्याने किरकोळ जखमा झाल्या. कुरार पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आणि त्याच दिवशी पांडेला अटक करण्यात आली होती

Exit mobile version