केरळमध्ये अशी झाली ‘दृश्यम’ स्टाईल हत्या

केरळमध्ये अशी झाली ‘दृश्यम’ स्टाईल हत्या

केरळमधील इडुक्की जिल्ह्यात दृश्यम चित्रपटाप्रमाणेच एक हत्या घडल्याचे समोर आले आहे.

एका बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. महिलेचा मृतदेह तिच्या शेजारच्या घरातील स्वयंपाक घराच्या खाली पुरलेला आढळला. थमदथिल सिंधू बाबू ही महिला १२ ऑगस्टपासून बेपत्ता होती. १५ ऑगस्टला सिंधू यांच्या आईने सिंधू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना केली होती.

सिंधू या आपल्या १२ वर्षांच्या मुलासोबत राहत होत्या. त्या मनिकुन्नेल बेनॉय यांच्या शेजारी होत्या; मात्र त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाल्याने त्या त्यांच्या मुलाला घेऊन बेनॉय यांच्या सोबतच राहू लागल्या होत्या. घराजवळील नव्याने उभारलेल्या मातीच्या चुली जवळील खड्ड्यात सिंधू यांच्या नातेवाईकांना त्यांचा मृतदेह आढळून आला.

हे ही वाचा:

शिवसेना आमदाराच्या उपस्थितीत ‘जुलूस जबरदस्ती’

जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा

बोरिवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग, जीवितहानी टळली 

गौहत्या करणाऱ्या जावेदला इलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले

तपासादरम्यान सिंधू यांचा मृतदेह मातीच्या चुलीजवळ सहा फूट खड्ड्यात पुरण्यात आला होता असे दिसून आले. हा खड्डा लाकडे ठेवण्यासाठी म्हणून तयार करण्यात आला होता. मृतदेह हा नग्नावस्थेत होता आणि मृतदेहाचा चेहरा प्लास्टिकने झाकलेला होता. मृतदेहासोबत मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरच्यासुद्धा पुरल्या होत्या. मृतदेह पुरल्यानंतर आरोपीने त्या जागेवर राख पसरवून ठेवली असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेचा गळा घोटून जीव घेण्यात आला असावा असे पोलिसांनी प्राथमिक अंदाजावरून सांगितले.

घडलेला प्रकार हा अगदीच ‘दृश्यम’ चित्रपटासारखा होता. सिनेमातही नायक मृतदेह असाच बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या खाली दडवून ठेवतो त्या प्रमाणेच आरोपीने महिलेचा मृतदेह नव्याने बांधलेल्या चुलीच्या जवळ खड्डा करून पुरला होता.

Exit mobile version