बॉलिवू़डचा अभिनेता सलमान खान याच्या घराजवळ गोळ्या झाडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. या आरोपींची चौकशी सुरू असून आता नव्याने माहिती समोर आली आहे.
मुंबईतील वांद्रे येथील अभिनेता सलमान खानच्या घरावर १४ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. यावेळी बिश्नोई टोळीचा यात हात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी ७२ तासांमध्ये पोलिसांनी दोन आरोपींना गुजरातमधून अटक केली. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी बिहारमध्ये सराव केला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. त्यानंतर यांना शस्त्र पुरवणाऱ्या दोघांनाही मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हे ही वाचा:
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी
भारत आत्मनिर्भर; चीनमधून खेळण्यांची आयात ७० टक्क्यांनी घटली
नैनीतालमध्ये वणवे पेटून जंगलांचे नुकसान; आयटीआय भवन जळालं
मनी लाँडरिंग प्रकरणात नाव गुंतल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी महिलेकडून २५ कोटी लुबाडले
बिहारमध्ये आठ गोळ्या झाडून गोळीबाराचा सराव केला असल्याचे आरोपींनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले आहे. पंजाबमधून अटक करण्यात आलेले आरोपी सोनू कुमार बिश्नोई आणि अनुजकुमार थापन यांनी पनवेलमधील दोन्ही शूटर्सना ३८ गोळ्या आणि दोन पिस्तूल दिले. माहितीनुसार, होळीच्या दिवशी दोन्ही आरोपी बिहारमधील त्यांच्या गावी गेले होते. दोन्ही नेमबाजांनी कधीच गोळ्या झाडल्या नसल्यामुळे या ठिकाणी सागर पालने चार गोळ्या झाडल्या आणि विकी गुप्ताने चार गोळ्या झाडत गोळीबार करण्याचा सराव केला. दरम्यान, माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आलेल्या, अशी माहिती आहे. मात्र, आरोपींनी पाच गोळ्या फायर केल्या आणि १७ राऊंड पोलिसांनी जप्त केले.