24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाबुलडोझरच्या भीतीने आरोपीने केलं आत्मसमर्पण

बुलडोझरच्या भीतीने आरोपीने केलं आत्मसमर्पण

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलची भीती गुन्हेगारांच्या मनात दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतापगडमधील महिलेवर अत्याचार करणारा एक तरुण बुलडोझरच्या भीतीने पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फरार तरुणाच्या घरासमोर बुलडोझर उभा होता. घर पाडलं जाईल या भीतीने हा तरुण पोलिसांना शरण आला आहे.

प्रतापगढ जिल्ह्यातील अंतू भागातील मार्केटजवळ राहणार्‍या ३५ वर्षीय महिलेचा नवरा अहमदाबादमध्ये टेलरिंगचे काम करतो. शुक्रवारी संध्याकाळी ही महिला पतीसोबत प्रतापगड जंक्शनवर पोहोचली. शनिवारी सकाळी ते अहमदाबादसाठी ट्रेन पकडणार होते. शनिवारी सकाळी ही महिला रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या शौचालयात गेली होती. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या शुभम मोदनवाल उर्फ ​​अण्णा याने शौचालयाचा दरवाजा आतून बंद करून महिलेसोबत मनमानी केली.

तेव्हा त्या महिलेने आरडाओरडा करताच तिचा पती पोहोचला असता आरोपी शुभमने तिला मारहाण करून पळ काढला. याप्रकरणी पीडितेने आरोपी शुभम मोडनवाल याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलीस त्याच्या दोन भाऊ आणि वाहन स्टँडच्या एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी करत होते.

हे ही वाचा:

कंभोज यांच्या घराकडे आता पालिकेची वक्रदृष्टी

‘त्या’ धावणाऱ्या मुलावर झाले आनंद महिंद्र फिदा

भाजपाला मतदान केल्यामुळे महिलेला तिहेरी तलाकची धमकी

तेलंगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध! दगडफेकीनंतर जमावबंदी लागू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमच्या कुटुंबीयांवर खूप दबाव टाकण्यात आला होता, मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर पोलिसांनी शक्कल लढवत रविवारी रात्री पोलीस बुलडोझरसह शुभमच्या घरी पोहोचले आणि सोमवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत आरोपी शुभम याने आत्मसमर्पण न केल्यास घर पाडू, असा इशारा दिला. त्यानंतर मात्र, घर पाडले जाईल या भीतीने शुभम हा पोलिसांना शरण आला.

योगी आदित्यनाथ यांच्या प्रत्येक प्रचारात बुलडोझर कायम आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. बुल्डोझर हायवे देखील तयार करतो, पूर देखील नियंत्रित करतो. याचबरोबर माफियांच्या अवैध धंदे देखील उद्धवस्त करतो, असे म्हणत योगी यांनी बुलडोझरला महत्त्व दिले आणि लोक त्यांना बुलडोझर बाबा म्हणू लागले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा