काही दिवसांपूर्वीच मुंबई साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीवर दोष सिद्ध झाला होता. दिंडोशी सत्र न्यायालयाने गुरुवार, २ जून रोजी या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला बलात्कार आणि हत्येसह सर्व आरोपांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे.
गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्याच दिवशी मुंबईत घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणानं संपूर्ण मुंबई हादरली होती. साकीनाका परिसरात ९ सप्टेंबरच्या रात्री एका ३० वर्षीय महिलेवर ४५ वर्षीय मोहन चौहान याने बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. त्यांनतर १० सप्टेंबर रोजी सकाळी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आणि काही तासांतच पोलिसांनी आरोपीला पकडले. एका वर्षाच्या आत जलद गतीने या प्रकरणाचा निकाल लावण्यात आला आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत राज्य सरकारच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्याला फाशीचीच शिक्षा झाली आहे.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार
ईडीच्या चौकशीआधी सोनिया गांधी यांना कोरोना
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये स्फोट, तीन जवान जखमी
याप्रकरणी पोलिसांनी ७७ साक्षिदारांचे जबाब नोंद करून ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार सर्व आरोपींमधून आरोप चौहान याला दोषी ठरवण्यात आले आहे. ३४६ पानांच्या या आरोपपत्रातील माहितीनुसार, पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या २० ते २५ दिवस आधीही आरोपीने महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमानं तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केले.