उत्तर प्रदेशातील सीतापूरमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपी तरुणानेही आत्महत्या केली आहे त्यामुळे म्हणजे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत आरोपी तरुणाने त्याच्या आईला गोळी मारली, पत्नीला हातोड्याने मारहाण करत तिची हत्या केली आणि त्यानंतर मुलांचीही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली.
मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाल्हापुरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शनिवार, ११ मे रोजी सकाळी ग्रामस्थांना ही घटना लक्षात आली आणि त्यानंतर तातडीने पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आरोपी तरुण हा मानसिकरीत्या आजारी होता आणि त्याने दारूचे अतिसेवन केले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री त्याने आधी आपल्या मुलांना गच्चीवरून खाली फेकले नंतर आईला गोळ्या घातल्या आणि पत्नीला हातोड्याने बेदम मारहाण करत तिची हत्या केली. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक विभागाच्या मदतीने पुरावा गोळे केले जात आहेत. घराच्या आता वेगवेगळ्या ठिकाणी ६ जणांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
हे ही वाचा:
‘नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरलेले २० किलो आयडी जागीच निष्प्रभ’
रिकामं डोकं कुलगुरूंची अक्कल काढते तेव्हा..
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंतरिम जामीन नाहीच
पाकव्याप्त काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये निदर्शने
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मानसिकरीत्या आजारी होता आणि त्याची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून स्थिर नव्हती. आरोपी अनुराग सिंहने आई सावित्री देवी (वय ६२), पत्नी प्रियांका सिंह (वय ४०), मुलगी अश्वी (वय १२), मुलगा अनुराग आणि मुलगी अरना यांची निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र, एकाच कुटुंबातील एवढ्या हत्या पाहून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.