बाबा सिद्दीकी प्रकरण; पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी

बाबा सिद्दीकी प्रकरण; पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी

बाबा सिद्दीकी प्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेल्या शुभु लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला सोमवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने प्रवीण लोणकरला २१ ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शुभु लोणकर याने त्याच्या फेसबुक पेज वरून बाबा सिद्दीकी हत्या संदर्भात पोस्ट व्हायरल केली होती, त्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा उल्लेख करण्यात आला होता, तसेच हल्लेखोर शिवकुमार असनी, धर्मराज यांना प्रवीण आणि शुभु यांनी कामाला ठेवले होते. तसेच शुभु हा लॉरेन्स बिष्णोई टोळीला शस्त्र पुरवठा करीत होता, त्याच्यावर पुण्यात एक गुन्हा दाखल आहे.

हे ही वाचा:

मंत्री अमित शाहांचा खोटा व्हिडीओ दाखवल्या प्रकरणी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्यावर गुन्हा दाखल!

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः पुण्यात लोणकरने दूध डेअरीत शूटर्सच्या घेतल्या बैठका

मूकबधिरांना आत्मनिर्भर करणाऱ्या ‘टीच’ संस्थेच्या अमन शर्मांना केशवसृष्टी पुरस्कार

नेमबाज स्वप्निल कुसाळेला २ कोटी रुपये तर गोळाफेकपटू सचिन खिलारीला ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द!

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शुबु लोणकर महाराष्ट्र या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकण्यात आली होती. या पोस्ट मध्ये बाबा सिद्दीकीच्या हत्येची जवाबदारी लॉरेन्स बिष्णोईने स्वीकारल्याचे स्पष्ट करण्यात आले होते, तसेच या पोस्टमध्ये बॉलिवूड कलाकार सलमान खान आणि दाऊदचा उल्लेख करण्यात आला होता. शुभु लोणकर हा पुण्यात राहनारा असून लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य असल्याचे बोलले जात आहे.शनिवारी रात्री बाबा सिद्दीकीची करण्यात आली होती, या हत्येप्रकरणात धर्मराज आणि गुरमेर सिंग या दोघाना जागेवर अटक करण्यात आली होती, तर शिवराज गौतम आणि मोहम्मद झिशान अख्तर हे दोन जण फरार झाले आहे. या हत्येनंतर दुसऱ्याचा दिवशी शुभु लोणकर महाराष्ट्र या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकण्यात आली होती, त्यात लॉरेन्स बिष्णोई चा उल्लेख करून या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती, तसेच पोस्ट मध्ये सलमान खान आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उल्लेख करण्यात आला होता.

फेसबुक पोस्ट करणारा शुभु लोणकर याला यापूर्वी शस्त्रतस्करी प्रकरणात अटक करण्यात होती, शुभु हा लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचे समोर आले होते.शुभु हा पुण्यात राहणारा असू शकतो. त्याचा भंगारचा व्यवसाय आहे, त्याने धर्मराज आणि शिवराज याना पुण्यात आश्रय दिल्याचे समोर आले. तसेच त्यानेच या हत्याची योजना आखली होती अशी माहिती समोर आली.

गुन्हे शाखेचे पथक शुभुला अटक करण्यासाठी पुण्यात दाखल झाले असता शुभु हा फरार झाला आहे. शुभुच्या कृत्याची खबर भाऊ प्रवीण लोणकर होती, त्यानेही त्यांना साथ दिल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेने प्रवीण लोणकर याला ताब्यात घेऊन मुंबईत आणून त्याला अटक करण्यात आली.
सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तप्रवीण लोणकरला २१ ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version