अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोन्ही आरोपींची दिल्ली पोलिसांकडून तीन तास चौकशी करण्यात आली. दोन्ही आरोपीच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांचे पथक बुधवारी मुंबईत दाखल झाले होते.
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली असून बिश्नोई टोळीवर दिल्लीत अनेक गुन्हे दाखल आहेत. या संदर्भात दिल्ली पोलिसांना हे जाणून घ्यायचे आहे की, अटक केलेले आरोपी गुप्ता आणि पाल हे बिश्नोई टोळीच्या दोन्ही सदस्यांच्या संपर्कात कसे आले.गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची टोळी अशी कोणतीही घटना घडवण्याचा कट आखत आहे का, हेही दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांना दोन्ही आरोपींकडून जाणून घ्यायचे आहे.
हे ही वाचा:
तेलंगणा, आंध्रमधील मुस्लिमांचे आरक्षण निवडणुकीच्या केंद्रस्थानी
‘राम मंदिराचा उल्लेख म्हणजे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन नाही’
भारतीयाच्या हृदयाने वाचवले पाकिस्तानच्या युवतीचे प्राण
अमेठी, रायबरेली भेटीपूर्वी गांधी भावंडे अयोध्येला थांबण्याची शक्यता
दिल्ली पोलिसांचे एक पथक बुधवारी मुंबईत आले आणि त्यांनी या दोन संशयितांची गुन्हे शाखेच्या कोठडीत सुमारे 3 तास चौकशी केली. दोन्ही संशयितांची चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलीस सध्या मुंबईत तैनात असून, संधी मिळाल्यास गुरुवारी पुन्हा त्यांची चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. १४ एप्रिल रोजी सकाळी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करून गुप्ता आणि पाल पळून गेले. मुंबई क्राइम ब्रँचने त्यांना ४८ तासांच्या आत गुजरातच्या भुज येथून अटक केली.
गोळीबारात वापरलेली शस्त्रे सुरतमधील तापी नदीत फेकण्यात आली होती, ती क्राइम ब्रँचने नदीत शोधून काढली.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी गुरुवारी संपत आहे. या दोघांच्याही कोठडीत वाढ करण्याची विनंती पोलिस न्यायालयाला करणार असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.