राजस्थानमधील उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मोहम्मद रियाझ आणि गोस मोहम्मदला अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. एका आरोपीचा पाकिस्तानातील इस्लामी संघटना दावत-ए-इस्लामीशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
आतापर्यंत या हत्येप्रकरणी दोन प्रमुख आरोपींसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील गोस मोहम्मद या आरोपीचा कराचीमधील इस्लामी संघटना दावत-ए-इस्लामीशी संबंध आहे. घौस याने २०१४ मध्ये कराचीला भेट दिली होती.
दावत-ए-इस्लामी ही पाकिस्तानातील एक धार्मिक चळवळ चालवणारी संस्था असून ती प्रेषित मुहम्मद यांच्या संदेशाचा प्रचार करणारी संस्था असल्याचा दावा करते. या संस्थेच्या माध्यामतून लोकांना ऑनलाइन इस्लामीक अभ्यासाचे धडे दिले जातात. तसेच या संस्थेमार्फत धर्मांतर आणि कट्टरपंथी बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षणही दिले जाते.
हे ही वाचा:
उदयपूर मधील कन्हैयालालसाठी २४ तासात जमले १ कोटी
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर
कुलगाममध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द; बहुमत चाचणीची आता गरज नाही
राजस्थानमधील उदयपूरमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यामुळे कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. दोन मुस्लीम कट्टरपंथी व्यक्तींनी दुकानात घूसन त्यांची हत्या केली आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.