बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. तसेच या घटनेचा बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचेची समोर आले आहे. अशातच आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. या आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. तर, या आरोपींना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पंजाबमधून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनुज थापन याने बुधवार, १ मे रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने तुरुंगातचं चादरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आरोपी अनुज थापनची प्रकृती गंभीर होती. आता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
अमृतपाल सिंग हा पाकिस्तानी आयएसआयच्या संपर्कात होता!
‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली यांचा भाजपात प्रवेश!
राहुल गांधींच्या वक्तव्यावर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचा आक्षेप
अभिनेता सलमान खान हा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या निशाण्यावर असून अनेक वेळा सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांना लॉरेन्स बिश्नोई कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. १४ एप्रिल रोजी पहाटे लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या दोन सदस्यांनी सलमान खानच्या वांद्र्यातील ‘गॅलक्सी अपार्टमेंट’वर गोळीबार करून सलमान खानला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्याची जवाबदारी तिहार तुरुंगात असलेला लॉरेन्स बिष्णोई चा परदेशात असलेल्या भाऊ अभिनव बिष्णोई याने फेसबुकवर पोस्ट करून स्वीकारली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती पुढे या प्रकरणात आणखी दोघांना पंजाबमधून मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. यांनी शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे.