बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी झिशान अख्तर अटकेत?

पोलिसांकडून अद्याप पुष्टी नाही

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी झिशान अख्तर अटकेत?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारा प्रमुख आरोपी पंजाब पोलिसांच्या ताब्यात असल्याचे वृत्त आहे. भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट करण्याच्या प्रकरणात झिशान अख्तर पंजाब पोलिसांच्या अटकेत

जालंदरमधील भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या घरी ब्लास्ट केल्याच्या प्रकरणात दोन जणांना केलेल्या अटकेत एक जण झिशान अख्तर असल्याचे समजते.

झिशान अख्तर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात फरार आरोपी असून मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून मुंबईत हत्या करण्यात आली होती.

हे ही वाचा:

पुनर्वास एज्युकेशन सोसायटीतर्फे गुरुवारी जागतिक होमिओपॅथी दिन

मनोरंजन कालिया यांच्या घराबाहेर झालेल्या स्फोटामागे आयएसआयचा हात

मोहम्मद बनला मोनिका, सद्दाम बनला रुबीना; ओळख लपवलेल्या बांगलादेशींना अटक

बंगाल की बांगलादेश? वक्फविरोधात मुर्शिदाबाद पेटले

पंजाबमध्ये झिशान अख्तरला अटक झाल्याने येत्या काळात त्याचा ताबा मुंबई पोलीस घेऊ शकतात.

मुंबई पोलिसांनी अद्याप झिशान अख्तरला अटक केल्याची पुष्टी केलेली नाही, पंजाब पोलिसांनी स्फोटाप्रकरणी अटक केलेल्या दोन जणांमध्ये झिशान अख्तर आहे का याची माहिती घेण्यात येत येत असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

Exit mobile version