पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या सैफ बिरअब्दुल खानला पवनहंस विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. सैफ हा जुहू पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. शनिवारी त्याला न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस त्याला कोठडीत ठेवण्यास जात असताना त्याने पळ काढला होता.
जुहू पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात जुहू पोलिसांनी शनिवारी सैफ बिरअब्दुल खान याला अटक केली होती, त्यानंतर त्याला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपी सैफ याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. जुहू पोलिस आरोपीला न्यायालयातून सांताक्रूझ पोलीस ठाण्यात असलेल्या सामान्य पोलीस कोठडीत ठेवण्यासाठी घेऊन जात असताना आरोपीने उलटी येत असल्याचे पोलिसांना सांगितले.
हे ही वाचा:
ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या पॉडकास्टला सोशल मीडियातून शेअर केले
‘ॲपल’ भारतात निर्यातीसाठी एअरपॉड्सचे उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत
उदयपूर: अरविंद सिंह मेवाड यांचे दीर्घ आजाराने निधन
अमृतसर मंदिरात ग्रेनेड हल्ल्यातील आरोपी पोलिस चकमकीत ठार!
पोलिसांनी विलेपार्ले पवनहंस विमानतळ येथे पोलीस व्हॅन थांबवून आरोपी सैफ याला उलटी करण्यासाठी व्हॅन बाहेर काढले असता सैफ याने पोलीस शिपायांच्या हातावर झटका देऊन पवनहंस विमानतळाच्या दिशेने पळ काढला आणि विमानतळाची कंपाउंड भिंतीवर उडी टाकली. आरोपीचा पाठलाग करणाऱ्या पोलीस शिपायानी आरोपीच्या पाठोपाठ कंपाऊन भिंतीवरून उडी टाकत आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक केली. या घटनेत एक पोलीस हवालदार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयलयात उपचार करण्यात आले आहे. याज प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात आरोपी सैफ विरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.