धारावीत सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद शहनवाज याला अटक केली आहे. शहनवाज याने गोळीबार केल्यानंतर पोलीस कंट्रोलला फोन करून गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली होती. नागरिकांमध्ये स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी त्याने गोळीबार केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
धारावीच्या मदिना कंपाउंड, साबून गल्ली येथे एका साबणाच्या कारखान्याच्या शटरवर सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर धारावीत एकच खळबळ उडाली होती, धारावी पोलीस गुन्हे शाखेचे पोलिसांनी गोळीबार झाला त्या ठिकाणी भेट देऊन घटनस्थळाची पाहणी केली. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नव्हते,साबणाच्या कारखान्याच्या शटर मधून ही गोळी आरपार गेल्याचे आढळून आले.
पोलिसांना या गोळीबाराची सर्वात प्रथम माहिती देणाऱ्या मोहम्मद शहनवाज याला धारावी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन जणांनी माझ्यावर गोळीबार केला, परंतु त्यांचा नेम चुकल्यामुळे मी बचावलो, हल्लेखोर हे चेहऱ्यावर रुमाल बांधून आले होते अशी माहिती पोलिसांना दिली.मात्र तो सांगत असलेल्या घटनेत पोलिसांना तफावत आढळून आल्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे उलट तपासणी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत हा गोळीबार त्यानेच केल्याचे कबुल केले.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशमध्ये आता लव्ह जिहाद प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा
उबाठा गटाच्या नेत्याचे अचानक निधन झाल्यानंतर अर्नाळ्यातील रिसॉर्टस पाडले!
पुणे; वाघाच्या कातड्याची तस्करी करणारी टोळी गजाआड !
ऑलिम्पिक २०२४; नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगला कांस्यपदक जिंकण्याची संधी !
नागरिकांमध्ये स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी त्याने हा गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले, पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले असल्याची माहिती धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजा बिडकर यांनी दिली.मोहम्मद शहनवाज हा नशेबाज असून त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.