साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला लवकरच शिक्षा

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला लवकरच शिक्षा

मुंबई साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी आरोपी सिद्ध झाला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपी मोहन काथवारू चौहानला बलात्कार आणि हत्येसह सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे. ही घटना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी तपास करून आरोपीला पकडून दोषारोपपत्र दाखल करून खटला चालवला होता. न्यायालयाने शिक्षेवरील चर्चेसाठी १ जून २०२२ ही तारीख निश्चित केली आहे.

मुंबईतील साकीनाका परिसरात ९ सप्टेंबरच्या रात्री एका ३० वर्षीय महिलेवर ४५ वर्षीय मोहन काथवारू चौहान याने बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. त्यांनतर १० सप्टेंबर रोजी सकाळी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आणि काही तासांतच पोलिसांनी आरोपीला पकडले.

खैराणी रोडवर एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याचा फोन कंट्रोल रूमला आला. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असता तेथे रक्ताने माखलेली महिला आढळून आली. तिला रुग्णालयात नेण्यात आल मात्र पीडित महिलेचा उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबरला मृत्यू झाला होता. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोच्या आत ही घटना घडली. वाहनात रक्ताचे डागही आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

हे ही वाचा:

मरिन लाईन्स समुद्रात इसमाची आत्महत्या

राकेश टिकैतवर शाईफेक

सिद्धू मुसवाला आणि बंदूक कल्चरचा संबंध!

लोनऍप वाल्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

याप्रकरणी पोलिसांनी ७७ साक्षिदारांचे जबाब नोंद करून ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार सर्व आरोपींमधून आरोप चौहान याला दोषी ठरवण्यात आले आहे. या दोषीवर १ जून रोजी न्यायालयात शिक्षेसाठी युक्तिवाद होणार आहे. हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात सूरु होता.

Exit mobile version