अमृता फडणवीस यांच्याकडे त्या तरुणीने मागितली १० कोटींची खंडणी; अनिक्षाला कोठडी

अनिक्षाला न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांच्या जबाबातील काही गोष्टी उघड

अमृता फडणवीस यांच्याकडे त्या तरुणीने मागितली १० कोटींची खंडणी; अनिक्षाला कोठडी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात विधिमंडळामध्ये त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांना अडकविण्याच्या प्रकरणी जे खळबळजनक निवेदन दिले त्या प्रकरणात आता आणखी नवी माहिती समोर आली आहे. ज्या अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली आहे, तिने अमृता फडणवीस यांच्याकडे १० कोटींची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. अनिक्षाला आता पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

मलबार हिल प्रकरण आरोपी अनिक्षा हिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यासंदर्भात पोलिसांनी ही माहिती दिली आहे. ऑडिओ क्लिप्स आणि इतर डाटा नष्ट करण्यासाठी आरोपीने अमृता फडणवीस यांच्याकडे १० कोटींची खंडणीही मागितली. १० कोटी दिले नाहीत तर ह्या सगळ्या ऑडिओ क्लिप्स आणि मेसेज मी सार्वजनिक करेन अशी धमकीही अनिक्षाने अमृता फडणवीस यांना दिली.  या सगळ्या प्रकरणात अनिक्षाची कसून चौकशी करणे गरजेचे असल्याने कोठडी गरजेची आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींना दिल्ली पोलिसांची नोटीस; काश्मीरमधील महिलांबद्दल केले होते विधान

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

रशियन एस ४०० वर भारी होणारे भारताने विकसित केली हवाई संरक्षण यंत्रणा

देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना अनिक्षाने संपर्क साधला आणि नंतर त्यांची जवळीक वाढली. तसा तिने अमृता फडणवीस यांना आपल्या वडिलांविरोधात असलेल्या केसेस मागे घेण्यासाठी गळ घातली, पण त्यांनी दाद दिली नाही तेव्हा त्यांना १ कोटीची लाच देऊ केली होती. त्यालाही बधत नाही बघितल्यावर त्यांचे फेक व्हीडिओ, मेसेजेस याच्या आधारे त्यांना अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचसंदर्भात अनिक्षाला अटक करण्यात आली आहे. तिचे वडील अनिल जयसिंघानी हे गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहेत.

अनिक्षा ही फरार असलेल्या आपल्या वडिलांच्या सातत्याने संपर्कात आहे हे स्पष्ट झालंय. सध्या आरोपी अनिक्षाचे वकील कोर्टात युक्तिवाद करत आहेत. सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाला. तिला अटक करताना ४२ ए अंतर्गत नोटीस देण्यात आली नाही. अनिक्षा महिला आहे. ती वकिलीच शिक्षण घेत आहे, असे वकील म्हणाले आणि त्यांनी तिला कमीत कमी पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती न्यायालयाकडे केली. वडिलांच्या विरोधात केसेस दाखल आहेत म्हणून त्यांना पकडण्यासाठी अनिक्षाचा वापर करून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसतोय, असेही वकील म्हणाले.

Exit mobile version