७० वर्षीय नोकराची हत्या, मालकाला अटक

७० वर्षीय नोकराची हत्या, मालकाला अटक

मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून ७० वर्षीय नोकराची हत्या केल्याची खळबळजनक घटना मानखुर्द येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी ३८ वर्षीय मालकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट करणायचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल खलील शेख (७०) असे हत्या कऱण्यात आलेल्या नोकराचे नाव आहे. अब्दुल मुलुंड येथे राहणारे मोहम्मद स्लिम जाफर मोहम्मद अख्तर आलम (३८) याच्याकडे स्वयंपाकी म्हणून कामाला होते. रविवारी सकाळी अब्दुल खालील शेख याचा मृतदेह मानखुर्द पोलिसांनी साठे नगर समोर असलेल्या उड्डाणपूजवळ एका विजेच्या खांबाजवळ आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाची ओळख पटवण्यात आल्यानंतर चौकशी सुरु केली असता शिवाजी नगर गोवंडी येथे राहणारा त्याचा जावई नन्ने साबीर शेख हा पुढे आला त्याने दिलेल्या फिर्यादीवरून मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. मृत अब्दुल शेख हे मोहम्मद सलिम जाफर मोहम्मद अख्तर आलम याच्या घरी मुलुंड येथे काम करीत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी मालक मोहम्मद सलीम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.

हे ही वाचा:

या पोलिसांनाही करता येणार ‘वर्क फ्रॉम होम’

डाव्याच नव्हे तर उजव्या एनजीओंचेही परवाने रद्द

मोदींची गाडी, विरोधक अनाडी

नक्षलवाद विरोधात पोलिसांचे ‘गडचिरोली फाइल्स’

अब्दुल हा माझ्या १२ वर्षाच्या मुलीला छेडत असे, तिच्या सोबत अंगलट करीत असल्याचा संशय होता व हत्येच्या दिवशी त्याने मुलीचा हात पकडून तिला झोपतेच खेचले याचा राग येऊन ही हत्या केल्याची कबुली मालक मोहम्मद सलिम याने दिली असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय खाडे यांनी दिली आहे. याप्रकरणी मोहम्मद सलीम याला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version