गेल्या तीन वर्षांपासून हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात जेरबंद असलेल्या पतीने पत्नीची शस्त्रक्रिया असल्याचा बनाव रचून न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याच्या चुकांमुळे पटियाला न्यायालयाने त्याचा हा बनाव उघड केला.
या आरोपीने पत्नीची शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगत त्यासंबंधीची कागदपत्रे सादर केली होती. त्यात तिला मेंदूचा गंभीर आजार असल्याचे नमूद केले होते. तर, शस्त्रक्रिया हाडांची होणार असल्याचे सांगण्यात आले होते. हे उघड झाल्यावर न्यायालयाने तत्काळ टिळक मार्ग पोलिस ठाण्यात या आरोपीची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
पटियाला न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पवन कुमार यांनी तातडीने या प्रकरणी आरोपी धर्मवीर आणि अन्य लोकांच्या भूमिकेसंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.
या मुद्द्यांवर वेधले लक्ष
महिलेला जो आजार दाखवला गेला होता, त्यात शस्त्रक्रिया न केली गेल्यास पाच महिन्यांपर्यंत तिच्या वाचण्याची शक्यता खूपच कमी असते. मात्र त्यात आजाराचा उल्लेख केलेली तारीख ३० जानेवारी २०२३ नमूद केली होती. कागदपत्रांमध्ये या महिलेला मेंदूचा गंभीर आजार असल्याचे नमूद केले होते. मात्र २४ जूनला तिची हाडांची शस्त्रक्रिया होणार होती.
हे ही वाचा:
अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यावरून पंतप्रधान मोदी इजिप्तला रवाना
सगळ्या विमान कंपन्यांना हवेत गुणवत्तावान वैमानिक; वाढणार घसघशीत पगार
राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याकडून मोदींना खास ‘शर्ट’ भेट
रुग्णालयाच्या नोंदीमध्ये या महिलेचा सिटी स्कॅनचा कोणताही अहवाल नाही. मात्र डोक्याच्या अथवा मेंदूच्या आजारामध्ये सिटी स्कॅनचा अहवाल अत्यंत आवश्यक असतो. डॉक्टरांनी दिलेल्या कागदांवर खूप सारे इंग्रजी शब्द चुकीचे लिहिले आहेत. उदा. ब्लीड हा शब्द बिल्ड लिहिला आहे. जी चूक एक डॉक्टर कधीच करू शकणार नाही.