27 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरक्राईमनामाबोपदेव बलात्कार प्रकरणातील आरोपी अख्तरला पकडले, यापूर्वीही बलात्काराचा गुन्हा

बोपदेव बलात्कार प्रकरणातील आरोपी अख्तरला पकडले, यापूर्वीही बलात्काराचा गुन्हा

आरोपी अख्तर शेखला पुण्यात आणणार

Google News Follow

Related

पुण्यातील बोपदेव घाटातील सामुहिक बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून पोलिसांनी अख्तर शेख (वय ३२ वर्षे) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला आज मंगळवारी दुपारपर्यंत पुणे शहरात आणले जाणार आहे.

अख्तर हा पुण्यात एका भंगाराच्या दुकानात काम करत होता. त्याच्यावर पूर्वीच काही गुन्ह्यांची नोंद देखील आहे. गुन्हा केल्यानंतर अख्तर दुसर्‍याच दिवशी नागपूरमध्ये पळून गेला होता. तेथे त्याची पत्नी राहात होती, तर प्रयागराज येथे त्याची आणखी एक पत्नी आहे. नागपूरमधून त्याने प्रयागराजला पळ काढला. पुणे पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. नागपूरमधून अख्तर प्रयागराजला गेल्याचे समजताच पोलिसांनी आपले पथक तेथे पाठवले.

दरम्यान, अख्तर प्रयागराजला गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच विमानाने दिल्ली गाठून पुढे अलाहाबादचे फ्लाईट पकडले. तेथून गाडीने प्रयागराज गाठले आणि प्रयागराजपासून सव्वाशे किलोमीटर दूर असलेले अख्तरचे गाव गाठले. तेथे स्थानिकांकडून माहिती घेत अख्तरला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अख्तरवर इंदापूरमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो तीन वर्षे कारागृहात देखील होता. तसेच इतरही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या तिसर्‍या साथीदाराचा शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा : 

मालाडमधील रिक्षाचालक, फेरीवाल्यांच्या मारहाणीत मनसे कार्यकर्ता दगावला

प्रभू श्रीरामांविरुद्ध अपमानजनक पोस्ट, एकाला अटक!

कॅनडाच्या ट्रुडो यांना लोक कंटाळले; कॅनडियन पत्रकाराचा दावा

कॅनडा पोलिसांचा गंभीर दावा; भारतीय गुप्तहेर लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत करतात काम

पुण्यातील बोपदेव घाट परिसरात तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पीडित तरुणी आपल्या मित्रांसह पुण्यातील कोंढवा येथील बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी राजेखां करीम पठाण आपल्या दोन मित्रांसह तेथे आला आणि मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगत, याठिकाणी फिरणे हे बेकायदेशीर असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्यांना धमकावत त्यांचे फोटो काढत तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवले आणि घाटाच्या खालच्या बाजूला असलेल्या येवलेवाडीमध्ये नेण्यात आली. याठिकाणी तरुणीवर तिघांकडून अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर तरुणीला सोडून आरोपी पळून गेले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा