अरेरे !! थ्रेशर मशीनमध्ये युवकाचा पाय अडकला आणि…

अरेरे !! थ्रेशर मशीनमध्ये युवकाचा पाय अडकला आणि…

बुलढाणा जिल्ह्यात एका ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. एक युवक शेतात मजुरीसाठी गेला असता त्याचा अपघात झाला आहे. थ्रेशर मशीनवर काम करताना त्याचा भीषण अपघात झाला आहे.

ही घटना मलकापूर तालुक्यातील भालेगाव रणगाव शेतात ही घटना घडली आहे. पवन श्रीमान बावसकर (२०) वर्षाचा युवक शेतात मजुरीसाठी जायचा. मात्र त्याने कधी थ्रेशर मशीनवर काम केले नव्हते. त्याने पहिल्यांदाच ते मशिन चालवले आणि त्याचा घात झाला. मशीनध्ये तूर टाकण्याचे काम सुरु होते. मशीनवरचे काम करत असताना संपूर्ण तुरी काढून झाल्या. त्यानंतर शेवटच्या वेळी त्याचा मशीनमध्ये अचानक पाय गेला. मशीनमध्ये पाय जाताच तो अतिशय गंभीर जखमी झाला. त्याचे पाय निकामी झाले. कमरेखालचा भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. मशिनमधून बाहेर काढून त्याला तात्काळ मलकापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही बातमी समजताच भालेगाव रणगावमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा:

परमबीर सिंह वसुली प्रकरणात सॉफ्टवेअरमध्ये ‘छोटा शकील’

शिक्षण मंत्र्यांच्या घराला आंदोलक विद्यार्थ्यांनी घेरले

मुंबईमध्ये फक्त भाजपच बदल घडवून आणेल

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि राहुल गांधी आले आमनेसामने आणि…

वास्तविक, अशा प्रकारच्या मशीन चालवण्यासाठी काही दिवस अनुभव घ्यावा लागतो. त्यानंतरच व्यवस्थित काम करता येते. पण, ग्रामीण भागात काही वेळा थेट कामाला सुरुवात केली जाते. हे काही कुशलतेचे काम नाही, असे समजले जाते.

गावात मजुरीशिवाय पर्याय नाही

ग्रामीण भागातील रोजगार म्हणजे शेतमजुरी करणे . त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भागात पाहिजे तसा रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे मिळेल ते ती मजुरी करण्याचीही तयारी असते. अशाच प्रकारचा कुशल असलेले काम अकुशल कामगार म्हणून करायला गेला. त्यात या युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. होतकरू मुलगा गेल्याने गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version