अरेरे! दसऱ्याच्या पुजेसाठी फुले आणायला गेलेले उपसरपंच अपघातात मृत्युमुखी

अरेरे! दसऱ्याच्या पुजेसाठी फुले आणायला गेलेले उपसरपंच अपघातात मृत्युमुखी

ब्रह्मपुरी येथील माजी उपसरपंच सुनील उर्फ पप्पू पाटील (४५) यांचा आज सकाळी एका अपघातात मृत्यू झाला. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर हा अपघात झाल्याने ब्रह्मपुरी गावावर शोककळा पसरली आहे. पाटील हे सकाळी पूजेसाठी फूल आणायला गेलेले असताना त्यांना एका क्रेनने धडक दिल्याने त्यांचा क्रेनखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

ब्रह्मपुरी गावचे माजी उपसरपंच सुनील पाटील आणि राजेंद्र दगडू पुजारी (५१) हे दोघे दसरा सणाच्या निमित्ताने फुले आणण्यासाठी बेगमपूर येथे जात होते. तेव्हाच बेगमपूरकडे जाणाऱ्या क्रेनने माचनूर चौकात पाटील आणि पुजारी यांच्या वाहनाला ठोकल्याने दोघेही खाली पडले. क्रेन चालकाने भीतीने क्रेन पुढे पाळवण्याच्या प्रयत्नात क्रेनचे चाक सुनील पाटील यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच मृत पावले. राजेंद्र पुजारी हे किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी जमाव संतप्त झाला होता.

हे ही वाचा:

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

काश्मीरमध्ये चकमक सुरूच; एका अधिकाऱ्याला आणि जवानाला वीरमरण

सरसंघचालकांनी केले अखंड भारताचे सूतोवाच

संरक्षण सिद्धतेत भारताने जगात आघाडी घेण्याची गरज

सुनील पाटील हे बेगमपूर न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक सुरेश पाटील यांचे पुत्र होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, आई- वडील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या अपघातात जखमी झालेले राजेंद्र पुजारी हे दामाजी साखर कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन संतप्त गावकऱ्यांना देऊन जमावाला शांत केले.

Exit mobile version