मुंबई गोवा हायवे जवळ माणगाव , जिल्हा रायगड येथे शुक्रवार सकाळी कार आणि ट्रक यात भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला आणि दोघे गंभीर जखमी आहेत. यात प्राण गमावलेले तिघेही बोरिवली येथील होते.
बोरिवली येथील हे तावडे कुटुंब असून त्यांची ओळख पटली आहे. तावडे कुटुंब बोरिवली वरून आपल्या गावी देवगड, जिल्हा सिंधुदुर्गला जात होते. गाडीत दर्शन तावडे वय वर्ष ३२, त्यांची पत्नी श्वेता तावडे ३२, त्यांची दोन लहान मुले रिवान आणि मुलगी रित्या, सोबत त्यांची आई वैशाली तावडे ७२ जात होते. अपघातात मृत्यू पावणाऱ्यात दर्शन तावडे यांची आई आणि दोन मुले यांचा समावेश असून स्वतः दर्शन आणि त्यांची पत्नी दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
माणगाव पोलीस ठाण्याचे सिनियर इन्स्पेक्टर राजेंद्र पाटील यांच्या तपासात असे निष्पन्न झाले की, हा अपघात सकाळी पहाटे ६.३० दरम्यान माणगाव तालुक्यातील इंदापूर गावातील आदर्शनगर कॉलनी येथे झाला. यात कार चालक दर्शन तावडे यांची चूक असल्याचे समोर येते आहे. त्यांनी लेन क्रॉस केली असावी आणि अचानक कार वळवली असावी. ट्रक चालकास अचानक समोर कार आल्यामुळे ट्रकवर नियंत्रण मिळवता आले नसावे, म्हणून हा अपघात झाला असावा.
हे ही वाचा:
मुद्रा योजनेंतर्गत ४०.८२ कोटी लोकांना मिळाली २३. २ लाख कोटींची कर्जे
सुखोई ३०मधून आकाशाला गवसणी घातल्यावर राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, छान वाटले!
बोनी कपूरची चांदीची भांडी जप्त, किंमत ३९ लाख
हुगळीत धावणार देशातील पहिली पाण्याखालून जाणारी मेट्रो
या कार मध्ये दर्शन तावडे यांच्या बाजूला त्यांची आई आणि आईच्या मांडीवर मुलगा रिवान होता. मागील सीट वर त्यांची पत्नी श्वेता आपल्या मुलीला घेऊन बसल्या होत्या. पुढे बसल्या असल्याकारणाने अपघातात दोन मुले आणि वयोवृद्ध महिला यांचा मृत्यू झाला, असे माणगाव हॉस्पिटल कडून सांगण्यात आले. भारतीय दंड संहिता अंतर्गत तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे, असे इन्स्पेक्टर पाटील यांनी सांगितले .