जुन्या मुंबई-नागपूर महामार्गावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. सिंदखेडराजाजवळ झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू, तर १३ जण जखमी झाल्याची माहिती आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. परंतु पोलिसांनी बचाव कार्य करत सोबतच कालांतराने वाहतूक सुरळीत केली.
हे ही वाचा:
विजय माने यांच्या कन्येचा विवाह सोहळा संपन्न
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णवीर नीरज चोप्रा भालाफेकीत जगात पहिल्यांदा ठरला अव्वल
ते हेरॉइन नव्हते होती फक्त पावडर! पण भोगली २० वर्षे शिक्षा
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावानजीक भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या भीषण अपघातात एकूण मृतकांची संख्या ८ असून १३ प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
ही बस संभाजीनगरहून वाशिमच्या दिशेने जात होती. त्याचवेळी मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. जखमींना तात्काळ सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.