राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) सचिन वाझे याच्या विरोधात आलेल्या दोन तक्रारी प्रकरणी वाझे याची खुली चौकशी सुरु करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये वाझेची संपत्ती, बँकेतील ठेवी, वाहनाबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते. एसीबीच्या या खुल्या चौकशीमुळे वाझेच्या अडचणीत वाढ होणार आहे.
हे ही वाचा:
शरद पवारांनी केली अनिल देशमुखांची पाठराखण
प्रभाग पुनर्रचना कशाला? भाजपचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र
ऑक्सिजनचा पुरवठा आणि गरज यात केजरीवाल सरकारचा घोटाळा
संजय राऊत वाजवतात राष्ट्रवादीची सुपारी
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हा मुकेश अंबानी स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तुरुंगात आहे. वाझे हा मुंबई पोलीस दलात असताना २००४ साली राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. १७ वर्षांनंतर वाजे हा पुन्हा मुंबई पोलीस दलात दाखल झाल्यानंतर २०२० मध्ये दुसरी तक्रार एसीबीकडे दाखल झाली होती. या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू होती. पोलीस खात्यात असताना वाझेने कमावलेली संपत्ती कुठल्या मार्गाने कमावली याची चौकशी करण्यात येत होती.
अंँटालिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाजेला अटक झाली आणि त्याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले. सचिन वाझेच्या संपत्ती, बँक बॅलन्स, वाहने, दागदागिने याबाबत खुली चौकशी करण्याबात एसीबीला परवानगी देण्यात आली आहे.