सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्ताच्या घरी सापडले एक कोटी

सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्ताच्या घरी सापडले एक कोटी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमध्ये एका उपायुक्ताला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्या घरीही छापेमारी करण्यात आली.

जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी आठ लाखांची लाच मागून प्रत्यक्षात १ लाख ९० हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत विभागाने नितीन चंद्रकांत ढगे (४०) या उपायुक्ताला अटक केली आहे. वानवडी येथील ढगे यांच्या निवास्थानाजवळ शनिवारी (१६ ऑक्टोबर) रात्री ९.३० च्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नितीन ढगे हे उपायुक्त तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आहेत. तक्रारदार यांच्या पत्नीने जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला होता. तेव्हा प्रमाणपत्र वैध करण्यासाठी ढगे याने त्यांच्याकडे आठ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या संदर्भातील तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली होती. ढगे याने पैसे घेऊन निवासस्थानाजवळ बोलावले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचत ढगे यांना रंगे हात पकडले.

हे ही वाचा:

‘संजय राऊत यांचे गांजावर इतके प्रेम बरे नाही!’

सहा गाड्या धडकल्या; तीन मृत्यू

नटवर सिंह म्हणतात, काँग्रेसला मिळतील पाचपैकी शून्य

युवराज सिंगला का झाली अटक?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर उपायुक्ताच्या घरी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. त्यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असून सुमारे दीड कोटी रुपयांच्या मालमत्तांचे कागदपत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ढगे सध्या एसबीच्या ताब्यात आहे. ढगे यांची चौकशी सुरु आहे.

Exit mobile version