आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिला युट्युबरला दणका

आसामी संस्कृतीबद्दल केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिला युट्युबरला दणका

इंस्टाग्रामवर जवळपास ३० लाख फॉलोअर्स असलेला अर्थविषयात माहिती देणारा अभिषेक कार याने आसाममध्ये कशा तांत्रिक विधी केल्या जातात, याचा एक बनावट दाखला दिल्याबद्दल अखेर जाहीररित्या माफी मागितली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्वशर्मा यांनी यासंदर्भात कारवाईचे आदेश दिल्यानंतर कार याने ही माफी मागितली आहे.

अभिषेक कार याने रिया उपरेती यांच्याशी झालेल्या एका मुलाखतीत विचित्र दावा केला होता. त्यात आसामचा इतिहास, संस्कृती यावरच वाईट टिप्पणी केली होती. त्यानंतर आसामच्या मुख्यमंत्री कार्यालयाने याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. खोटी माहिती प्रसारित करत असल्याबद्दल हे कारवाईचे आदेश देण्यात आले.

हे ही वाचा:

महाराष्ट्राच्या मुली उपांत्यपूर्व फेरीत, पण मुले उपउपांत्यपूर्व फेरीतच गारद

हे होणारच होतं…ठाकरे-काँग्रेस ही खुर्चीसाठीचीचं युती होती!

श्रीराम कृपेने मिळाली सजावटीची सौंदर्यदृष्टी!

जयंतीदिनी फातिमा शेखना ‘भावपूर्ण श्रद्धांजली’

त्यावर पोलिस महासंचालक जीपी सिंग यांनी प्रतिसाद देताना कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हटले होते. पण त्यानंतर काही वेळातच कार याने व्हीडिओच्या माध्यमातून माफी मागितली. मुलाखतकाराला मी ते वक्तव्य काढून टाकण्यास सांगितले आहे, असेही त्याने म्हटले.

कारने आपल्या या व्हीडिओत हात जोडत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. मी हे जाणीवपूर्वक केले नाही. मला कोणताही गोंधळ निर्माण करायचा नव्हता. पण ते झाले. ज्यांना यामुळे वेदना झाल्या आहेत, त्यांची मी माफी मागतो.

कार हा आर्थिक विषयावर भाष्य करतो. गुंतवणूक, स्टार्टअप याविषयी तो भाष्य करतो. युट्यूबवर त्याचे २० लाख फॉलोअर्स आहेत. उपरेती यांच्याशी झालेल्या संवादात त्याने म्हटले आहे की, आसामच्या मायोंगमधील महिला तिला प्राप्त असलेल्या सिद्धींच्या जोरावर माणसाला बकरीत रूपांतरित करते. नंतर त्याला पुन्हा मनुष्यरूपात आणून त्याच्याशी संभोग करते. कारने केलेल्या या दाव्यानंतर त्यावर जोरदार टीका झाली.

 

Exit mobile version