१९९३ च्या साखळी स्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता

१९९३ च्या साखळी स्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता

अयोध्येत बाबरीच्या ढाच्याचे पतन झाल्यानंतर १९९३ मध्ये देशभरात मुंबईसह सहा ठिकाणी ट्रेनमध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले होते. यासंदर्भात महात्त्वाची अपडेट समोर आली आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. राजस्थानमधील अजमेरच्या टाडा (Terrorist and Anti- disruptive Activities Act) न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. बॉम्बस्फोटानंतर तब्बल ३१ वर्षांनंतर हा निकाल देण्यात आला आहे. या प्रकरणी इतर दोन आरोपी इरफान आणि हमीदुद्दीन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

१९९३ मध्ये मुंबई, लखनऊ, कोटा, कानपूर, हैदराबाद आणि सूरत या शहरांमधील रेल्वे गाड्यांमध्ये साखळी बॉम्ब स्फोट घडविण्यात आले होते. दरम्यान, सीबीआयने टुंडाला या स्फोटांचा मास्टरमाईंड ठरवलं होतं. तर इरफान आणि हमीमुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच २०१३ मध्ये नेपाळच्या सीमेवरून तुंडा याला अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींविरुद्ध टाडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची साक्ष झाली आहे.

सीबीआयने टुंडाला या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड मानले होते. टुंडावर देशात विविध ठिकाणी दहशतवादाचे खटले प्रलंबित आहेत. टुंडाने तरुणांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. जुनैद या पाकिस्तानी नागरिकासह त्याने १९९८ मध्ये गणेशोत्सवादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखल्याचेही सांगितले जाते.

हे ही वाचा:

न्यायाधीशाला योग्य प्रकारे सॅल्युट न करणे भोवले

हिंसाचार करणाऱ्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट, व्हिसा रद्द करणार

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे बीसीसीआयचे वार्षिक कंत्राट रद्द

तृणमूलचा नेता शेख शहाजहान याला अखेर अटक

अब्दुल करीम टुंडा कोण आहे?

मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये सहभागी होण्यापूर्वी टुंडा याने जालीस अन्सारीसोबत मुंबईत मुस्लीम समुदयासाठी काम करण्याच्या उद्देशानं ‘तंजीम इस्लाह उल मुस्लीमीन’ नावाची संस्था स्थापन केली होती. मध्य दिल्लीच्या दरियागंजमध्ये छत्ता लाल मिया भागात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या टुंडाने आपल्या वडिलांचं गाव गाझियाबादमध्ये सुतारकाम सुरु केलं होतं. त्यानंतर त्यानं भंगार व्यवसायही केला. ८० च्या दशकात पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयच्या एजंट्सच्या माध्यमातून तो लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. त्यानंतर तो एक कट्टरपंथी बनला.

Exit mobile version