सांगलीच्या तासगावमध्ये एका बाळाचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. परिचारिका असल्याचे भासवून महिलेने बाळाचे अपहरण केले आहे. तासगावमधील सरस्वती आनंद हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, याप्रकरणी तासगाव पोलिसांकडून आरोपी महिलेचा तपास सुरु आहे
डॉ. अंजली पाटील यांच्या सरस्वती आनंद हॉस्पिटलमध्ये सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. चिंचणी येथील हर्षदा शरद भोसले या प्रसूतीसाठी शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. या महिलेने शनिवारी मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यानंतर बाळ आणि तिच्यावर या हॉस्पिटलमध्येच उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेच्या एका दिवसाच्या बाळाचे आज, २४ जुलैला अपहरण झाले आहे.
हे ही वाचा:
WHO कडून ‘मंकीपॉक्स’ जागतिक आणीबाणी म्हणून घोषित!
शिवसेना फुटण्याचे श्रेय केवळ उद्धव ठाकरे यांचे!
ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!
मविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!
अपहरण करणारी महिला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आपण परिचारिका असल्याचे भासवून हॉस्पिटलमध्ये कामाला लागली होती. या महिलेनेच या बाळाचे अपहरण केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी सकाळी ही महिला संबंधितांच्या वॉर्डमध्ये गेली. तिथून या महिलेने अतिशय हुशारीने एका दिवसाच्या बाळाला घेतले. आपल्या जवळ असलेल्या पिशवीमध्ये बाळाला ठेवले आणि ही पिशवी घेऊन ही महिला त्याठिकाणावरुन फरार झाली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांकडून आरोपी महिलेचा तपास सुरु आहे. या घटनेमुळे सांगलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आपल्या बाळाचे अपहरण झाल्यामुळे पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.