दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी आमदार मोहिंदर गोयल यांना नोटीस बजावली असून ते रिठाळ्याचे आमदार आहेत. बांगलादेशींकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांची स्वाक्षरी आणि शिक्का सापडल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी आप आमदाराच्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.
बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई करताना बनावट कागदपत्रे सापडल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी आमदार मोहिंदर गोयल आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट कागदपत्रांवर मोहिंदर गोयल यांची स्वाक्षरी आणि अधिकृत शिक्का सापडला आहे. त्यामुळे गोयल यांची शनिवार, ११ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता वरिष्ठ पोलिस अधिकारी चौकशी करतील.
हेही वाचा..
सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सातही आरोपींवर मोक्का!
केरळमध्ये दलित मुलीचे तब्बल ६४ जणांनी केले शोषण
हे होणारच होतं…ठाकरे-काँग्रेस ही खुर्चीसाठीचीचं युती होती!
‘AI ऍक्शन’साठी पंतप्रधान मोदी जाणार फ्रान्सला
दिल्लीसह देशभरात सध्या बांगलादेशी आणि रोहिंगे यांच्याविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्या निर्देशानुसार, दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना निर्वासित करण्यासाठी दोन महिन्यांची पडताळणी मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये ३० हून अधिक बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना अटक करून हद्दपार केले आहे. तसेच दिल्लीत राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड आणि इतर सरकारी ओळखपत्रे पुरवणाऱ्या टोळीचाही पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पर्दाफाश केला होता. या कारवाईत दोन बांगलादेशी नागरिकांसह टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली आहे.