आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना एसीबीकडून अटक

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना एसीबीकडून अटक

आम आदमी पक्षाच्या (आप) अडचणी वाढल्या असून ‘आप’ चे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) शुक्रवार, १६ सप्टेंबर रोजी अमानतुल्ला खान यांची चौकशी करून त्यांना अटक केली आहे.

दिल्ली वक्फ बोर्ड प्रकरणात कारवाई दरम्यान एसीबीने छापे टाकले होते. दिल्ली वक्फ बोर्ड भरतीतील कथित अनियमिततेची चौकशी एसीबीकडून सुरू आहे. याआधी एसीबीने त्यांच्या घरावर आणि त्यांच्या संबंधित इतर पाच ठिकाणी छापे टाकले. या छापेमारीत १२ लाख रुपये आणि एक विना परवाना पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.

खान यांना २०२० मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात काल दुपारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. वक्फ बोर्डाचे नवीन कार्यालय सुरू केल्यामुळे त्यांना बोलावण्यात आल्याचा दावा खान यांनी केला होता.

हे ही वाचा:

‘जन धन’ नावाचा चमत्कार!

चीनमधली ६५६ फूट उंचीची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी

बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे दोघांना गमवावे लागले हात

आज शेअर बाजारावर पडझडीचे सावट

वक्फ बोर्डाच्या मालमत्तांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून खान यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून ३२ जणांना कामावर ठेवल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर वक्फ बोर्डाची मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचा आणि वक्फ खात्याच्या व्यवस्थापनात आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप आहे. तसेच छापेमारी दरम्यान खान यांच्या घरातून आणि कार्यालयातून काही कागदपत्रे सापडल्याची माहिती आहे.

Exit mobile version