आम आदमी पार्टीचे नेते आणि खासदार संजय सिंग यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या दिल्ली येथील घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर संजय सिंग यांना अटक केली गेली.
दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय सिंग यांच्या घरावर छापेमारी केली. त्यानंतर तब्बल १० तास संजय सिंग यांची चौकशी करण्यात आली. मनी लॉन्डरिंग प्रकरणात ही छापेमारी सुरू होती. नंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
त्याआधी, संजय सिंग यांच्या अनेक निकटवर्तीयांच्या घरीही छापेमारी झाली. संजय सिंग यांचे नाव ईडीने आरोपपत्रात दाखल केले आहे. ईडीने आपल्या या आरोपपत्रात म्हटले आहे की, दिनेश अरोरा नावाचा माणूस हा मध्यस्थ होता, त्याने सांगितले की, त्याची संजय सिंग यांच्याशी रेस्टॉरन्टमध्ये भेट झाली.
हे ही वाचा:
आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने जिंकले सुवर्णपदक!
शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी सुमोटो याचिका दाखल
चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी लवकरच हवाई दल आणखी सुसज्ज
पुण्याच्या पालकमंत्री पदी उपमुख्यमंत्री अजित पवार!
यासंदर्भात आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी या छापेमारीवर टीका केली आहे. २०२४च्या निवडणुकीत पराभव होणार असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने ही पावले उचलली आहेत.
याआधी, मार्च महिन्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आपचे नेते मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. त्यांनाही ईडीनेच अटक केली. दिल्लीतील मद्य घोटाळ्यात त्यांचे नाव घेण्यात आले होते.