दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी हवाला प्रकरणी ईडीने अटक केली. सत्येंद्र जैन यांच्याकडून ४.८१ कोटींची संपत्ती जप्त केल्यानंतर महिन्याभराने ईडीने ही कारवाई केली आहे.
हवालाच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप जैन यांच्यावर असून सदर कंपनी ही कोलकात्यातील कंपनी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. हवालाच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याच्या बदल्यात बनावट कंपन्यांकडून पैसे घेण्याचा आरोप जैन यांच्यावर आहे. मनी लॉन्डरिंगसाठी या पैशांचा उपयोग करण्यात आला आहे.
यासंदर्भात नंतर आम आदमीचे नेते आणि भाजपा यांच्यात खडाजंगी उडाली आहे. आपचे नेते मनीष सिसोदिया यानी म्हटले आहे की, जैन यांच्यावर एका बनावट प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपाने हे बनावट प्रकरण रचले आहे. हिमाचल प्रदेशातील आम आदमी पक्षाच्या प्रचाराला अडथळा आणण्यासाठी हे सुरू आहे.
सिसोदिया यांनी म्हटले आहे की, गेली आठ वर्षे हे बनावट प्रकरण लावून धरले जात आहे. अनेकवेळा जैन यांना ईडीने समन्स पाठवले आहे. पण या काळात त्यांच्याकडून काहीच न मिळाल्यामुळे त्यांना बोलावणे ईडीने थांबवले होते. पण आता सत्येंद्र जैन हे हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळत असल्यामुळे त्यांना त्रास दिला जात आहे. पण हे प्रकरणच बनावट असल्यामुळे ते लवकरच बाहेर येतील.
हे ही वाचा:
आव्हाडांसाठी पोलिसाने कारचालकाला लगावली थप्पड
साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला लवकरच शिक्षा
सिद्धू मुसवाला यांच्या हत्येमागे गँगस्टर गोल्डी ब्रार
२०१७मध्ये सीबीआयने जैन यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. बेनामी संपत्तीच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयने म्हटले होते की, जैन यांनी २०० बिघा शेतजमीन दिल्लीतील त्यांच्या कंपन्यांच्या नावावर घेतली. त्यात त्यांनी काळा पैसा पांढरा केला.
यह केस जब पहली बार आया था तो मैंने भरी PAC में सत्येंद्र जैन से जवाब माँगा था।बौने ने उसे सपत्नीक मेरे सामने रोने-धोने के लिए बिठाया।मैंने कहा निजी सम्बन्ध अपनी जगह पर इसका जवाब दो,तो आजकल पंजाब का वसूली-प्रमुख बना नया“चिंटू” काग़ज़ फैलाकर बोला “सर मैं CA हूँ, कोई गड़बड़ नहीं है” https://t.co/sbDxm2s1MC
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) May 30, 2022
दरम्यान यावर आम आदमी पार्टीचे संस्थापक पण आता आम आदमी पार्टीपासून दुरावलेले प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण जेव्हा माझ्याकडे प्रथम आले तेव्हा मी सत्येंद्र जैन यांच्याकडून उत्तर मागितले होते. पण त्यांना सपत्नीक माझ्यासमोर रडारड केली. तेव्हा मी सांगितले की, खासगी संबंध वेगळी गोष्ट आहे. तेव्हा पंजाबचा वसुली प्रमुख बनलेल्या चिंटूने कागद दाखवत मी सीए आहे, त्यांच्या व्यवहारात कोणतीही गडबड नाही, अशी हमी दिली.