छत्रपती संभाजी महाराजांचा स्टेटस ठेवला म्हणून परभणीत तरूणाला मारहाण

आयान, रिजवान, फैजल यांच्याविरोधात तक्रार दाखल

छत्रपती संभाजी महाराजांचा स्टेटस ठेवला म्हणून परभणीत तरूणाला मारहाण

एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलेले असताना परभणीत एका तरुणाला छत्रपती संभाजी महाराजांचा स्टेटस ठेवला म्हणून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात ताणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

परभणीमधील गंगाखेड शहरातील नगरेश्वर गल्ली येथील अविनाश उमा खवडे (वय २२, रा. नगरेश्वर गल्ली, गंगाखेड) याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊन्टवर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्टेटस ठेवला. फिर्यादीनुसार, शुक्रवारी दुपारी त्याने इन्स्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात तलवार आणि औरंगजेबचा फोटो असलेली स्टोरी ठेवली होती. यानंतर रात्री ८.३० वाजताच्या सुमारास फैजल नावाच्या तरुणाने अविनाश याला निरोप दिला की, तौफिक याने तुला मशिदीजवळ बोलावले आहे. मात्र, मशिदीजवळ जाताचं हे तरुण आणखी मुले जमवत असल्याचे बघून अविनाश नगरेश्वर गल्लीतील महादेवाच्या मंदिराजवळ गेला. मात्र, आयान रिजवान, फैजल याच्यासह चार ते पाच जणांनी त्याला गाठून त्याच्या स्टेटसबद्दल जाब विचारण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा : 

नागपूर हिंसाचार: डेमोक्रॅटिक पार्टीच्या हमीद इंजिनियरसह युट्यूबर मोहम्मद शहजाद खानला अटक

उत्तर प्रदेशमध्ये सामुहिक बलात्कार, हत्या प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार

बंगल्यात रोकड सापडलेल्या दिल्लीतील न्यायाधीशांचे साखर कारखाना बँक घोटाळ्यात नाव

ट्रम्प यांचा चार देशांमधील स्थलांतरितांना दणका; ५ लाख स्थलांतरित होणार हद्दपार

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्टोरी का ठेवली? असा प्रश्न विचारात त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मंदिराजवळ उपस्थित असणाऱ्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अविनाश याने घटनास्थळावरून पळ काढत पोलिस ठाणे गाठले. त्याच्या फिर्यादीवरून आयान, रिजवान, फैजल (सर्व रा. राज मोहल्ला) याच्यासह अनोळखी एक, अशा चार जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे. पुढील तपास गंगाखेड पोलीस करत आहेत. तर, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

एका वाक्यात कचरा केला... | Dinesh Kanji | Atul Bhatkhalkar | Aditya Thackeray | Sanjay Raut |

Exit mobile version