सपाला मतदान करण्यास नकार देणाऱ्या तरुणीची मैनपुरीमध्ये हत्या

कुटुंबीयांनी केला आरोप

सपाला मतदान करण्यास नकार देणाऱ्या तरुणीची मैनपुरीमध्ये हत्या

उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये एका तरुणीची हत्या झाली असून यामुळे खळबळ उडाली आहे. पोटनिवडणूक काळात ही हत्या झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी संबंधित तरुणीची हत्या केल्याचा आरोप पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पीडित तरुणीच्या कुटुंबाने सपाला मतदान करण्यास नकार दिला म्हणून मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मृत तरुणीच्या वडिलांनी आणि आईने सपाच्या गुंडांचे नाव घेत त्यांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे. अखिलेश यादव यांचा पक्ष समाजवादी पक्षाचे समर्थक प्रशांत यादव आणि त्यांचे काही सहकारी आले होते. त्यांनी आम्हाला सपाला मतदान करण्यास सांगितले. यावर आम्ही भाजपाचे समर्थक आहोत असे त्यांना सांगत सपाला मतदान करण्यास नकार दिला. यानंतर आज मतदानानंतर मुलीची हत्या करण्यात आल्याचे मृत तरुणीच्या आई वडिलांनी सांगितले.

हे ही वाचा : 

मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही खूप प्रसिद्ध आहात!

डोमिनिकानंतर गयाना आणि बार्बाडोसकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान जाहीर!

बिटकॉइन्समध्ये व्यवहार केला आहे का? भाजपाचा सुप्रिया सुळे, नाना पटोलेंना सवाल

विधानसभा २०२४: नेत्यांसह, खेळाडू आणि कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

दरम्यान, या तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. पिडीतेचा मृतदेह नग्नावस्थेत एका पोत्यात भरलेला सापडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. जाटवानमध्ये ही घटना घडली आहे. यादव आणि त्याचे सहकारी तरुणीला घरातून उचलून घेऊन गेले होते. तिला नशेचा पदार्थ देऊन तिची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री १२ वाजता आरोपी या तरुणीला घरातून घेऊन गेले होते. मृत तरुणीचा मृतदेह मैनपुरी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला आहे. यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पीडित तरुणीवर अत्याचार झाला की नाही हे स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version