26 C
Mumbai
Wednesday, December 18, 2024
घरक्राईमनामामुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग

मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग

पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळील घटना

Google News Follow

Related

मुंबईतील उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणी कामानिमित्त चर्नी रोड येथे कामासाठी जात असताना ही घटना घडली.

मालाड रेल्वे स्थानकातून ही तरुणी चर्नी रोड येथे कामानिमित्त जात होती. ग्रॅन्ट रोडजवळ एका तरुणाने तिची छेड काढण्यास सुरुवात केली. अश्लील चाळे आणि अश्लील वक्तव्य करत तो तरुणीला त्रास देत होता. संबंधित तरुणीने आरडाओरडा केला असता त्या तरुणाने लोकलचा वेग कमी होताच उडी मारून पळ काढला. याप्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान असाच गंभीर प्रकार घडला होता. पीडित तरुणी नवी मुंबईतील बेलापूर येथे परीक्षेला जात होती. तेव्हा ट्रेन सुरू होताच आरोपी डब्ब्यात चढला. गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करताच सहप्रवाशाने त्याला हटकले आणि तरुणीने आरडाओरडा करताच आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर उतरुन पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, मानसिक धक्का बसलेल्या पीडित तरुणीची परीक्षा बुडाली.

हे ही वाचा:

३६५ दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या सरकारचा ट्विस्ट आणि टर्न्सचा प्रवास कसा होता?

चालत्या गाडीवर झाड कोसळून सहायक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

८० व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या अभिनेत्री आशा नाडकर्णी यांची कारकीर्द कशी होती?

मागाठाणे जमीन खचल्याप्रकरणी दोघाना अटक व जामीन

रात्री ९ ते सकाळी ६ दरम्यान लोकलमधील महिलांच्या डब्ब्यात एक सुरक्षारक्षक तैनात असतो. याआधी सुद्धा मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांविरोधात गुन्हे घडले आहेत, त्यामुळे सुरक्षेसाठी महिलांच्या डब्ब्यात सुरक्षा रक्षक तैनात केला जातो. मात्र, सततच्या घडत असलेल्या या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हाउपस्थित झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा