एका तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये रेल्वे रुळांवर निशांक राठोर (२१) या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह रविवार,२५ जुलैला आढळून आला. धक्कादायक म्हणजे मृतदेह सापडण्याच्या दोन तास आधी मृत निशांक याच्या वडिलांना ‘गुस्ताख ए नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ असा संदेश व्हाट्सअपवर प्राप्त झाल्याने याप्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
प्राथमिक तपासात पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितले आहे. मात्र या घटनेपूर्वीच निशांकच्या वडिलांच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजमुळे मृत्यूबाबत संभ्रम वाढला आहे. विद्यार्थ्यांचे वडील उमाशंकर राठोड यांना मुलाच्या मोबाईलवरूनच मेसेज आला की, “राठौर साहाब आपका बेटा बहुत बहादुर था. गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा।” मृत मुलाच्या व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामवरही डीपीमध्ये त्याच्या फोटोसह हा संदेश टाकण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा सस्पेन्स वाढत चालला आहे. रेल्वे रुळावर निशांकचे दोन भागात तुकडे झाल्याचं आढळून आलं आहे.
हे ही वाचा:
सिव्हील इंजिनिअर डिप्लोमा केलेल्यांना कंत्राटदार नोंदणीसाठी हिरवा कंदील
‘खोबरे गेले करवंटी हातात राहिली आतातरी शहाणे व्हा’
पराभवानंतर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे ‘एकला चालो रे!’
सोनिया गांधींची पुन्हा ईडी चौकशी; आंदोलन करणारे राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात
रविवारी घडलेल्या या घटनेनंतर रेल्वेची वेळ, सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पोलीसांनी निशांकने आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. मात्र निशांक आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे, असे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. निशांक हा भोपाळमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात पाचव्या सत्राचा विद्यार्थी होता. तो मूळचा भोपाळ येथील नर्मदापूरच्या सिवनी- माळवा येथील रहिवासी होता. निशांक भोपाळला बीईची पदवी घेण्यासाठी आला होता.