ठाण्यासारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर एका ३१ वर्षीय महिलेचा विनयभंग करून पळून जाण्याऱ्या २० वर्षीय तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. मंगळवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास ठाणे येथील प्लॅटफॉर्म 10A कडे जाणार्या जिन्यावर ही घटना घडली असून अंबरनाथमध्ये राहणारी महिला ऐरोली येथील एमएनसी मध्ये काम करणारी महिला कामावर जात असताना ही घटना घडली.
डीआर साहू असे आरोपीचे नाव असून तो घणसोली येथे राहतो आणि तीन हात नाका येथील एक खासगी कंपनीत काम करतो. संबंधित महिला पायर्या उतरत असताना आरोपीला विरुद्ध दिशेने येताना पाहिले होते. गर्दीचा फायदा घेत आरोपीने अयोग्यरित्या स्पर्श केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावध दाखवत त्या महिलेने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले अशी माहिती ठाणे रेल्वे स्थानकावरील वरिष्ठ निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.
हे ही वाचा :
‘या’ दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन
अखेर इराणने हिजाब कायदा बदलण्याचा घेतला निर्णय
जुळ्या बहिणींशी लग्न करणं तरुणाला भोवणार
‘पंतप्रधान मोदी सर्व देशांना एकत्र आणतील’
त्यानंतर सहप्रवाशांनी ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला सावध केले व आरोपीला पकडून पोलिस ठाण्यात आणले तसेच महिलेने गुन्हा दाखल केल्यानंतर विनयभंगाच्या आरोपाखाली त्या तरुणाला अटक करण्यात आली. संबंधित आरोपीविरुद्ध आणखी पुराव्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्या तरुण आरोपीवर यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत का हे जाणून घेण्यासाठी पोलिस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करीत आहेत.