पाकस्थित गुप्तचर एजंटच्या संपर्कात आलेल्या तरुणाला ठाण्यातून अटक

पाकस्थित गुप्तचर एजंटच्या संपर्कात आलेल्या तरुणाला ठाण्यातून अटक

पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पुरविल्या प्रकरणी ठाणे शहरातून अटक केली.

गौरव पाटील (२३) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गौरव हा आयटीआयचा विद्यार्थी असून भारतीय सैन्य दलातील एका विभागात इंटर्नशिप करीत होता. गौरव हा फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह
(पीआयओ)च्या तीन एजंटच्या संपर्कात आला होता.

एप्रिल – मे ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान गौरवने फेसबुक, व्हाट्सअप्पच्या द्वारे भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तान स्थित गुप्तचर ऑपरेटिव्ह एजंटला पुरविली असल्याची माहिती उघड होताच राज्य दहशतवादी विरोधी पथक ठाणे युनिटने गौरव पाटीलला ठाण्यातून अटक केली आहे.

हे ही वाचा:

लोकल ट्रेनमध्ये तरुणीसोबत ठुमकने होमगार्डला पडले महागात!

पडघ्यात ‘काँग्रेसच्या मुहब्बत की दुकान’ची ब्रांच…

२० हजारात बेकायदेशीर बांग्लादेशीची घुसखोरी, एजंटसह सात बांग्लादेशीना अटक!

मला गोळी मारली जाईल; छगन भुजबळांचा अधिवेशनात खळबळजनक दावा

पाटील याच्या चौकशीत तो दोन ‘पीआयओ’ एजंट सोबत सतत चॅटिंगच्या माध्यमातून संपर्कात होता, तसेच त्याने या पीआयओ वेळोवेळी भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनिय माहिती वेळोवेळी पुरविली असल्याचे तसेच मोबदल्यात पीआयओ कडून ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी गौरव पाटील आणि त्याच्या संपर्कातील इतर ०३ व्यक्ती अशा एकूण ०४ इसमां विरूध्द दहशतवाद विरोधी पथकाने येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गौरव पाटील याला या गुन्हयात अटक करण्यात आली असुन दहशतवाद विरोधी पथकाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Exit mobile version