27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामावांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणाला मारहाण

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणाला मारहाण

वांद्रे रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू

Google News Follow

Related

मुंबईतील वांद्रे येथे लव्ह जिहादच्या आरोपावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तरूणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माजी आमदार वारीस पठाण यांच्याकडून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर एक मुस्लीम तरुण एका अल्पवयीन हिंदू मुलीसोबत रात्री फिरताना दिसला होता. हा तरुण मुलीची फसवणूक करत असल्याच्या संशयावरून काही तरूणांच्या गटाकडून या तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला असून आता या तरूणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. माजी आमदार वारीस पठाण यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वांद्रे रेल्वे पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून हा व्हिडीओ कुणी व्हायरल केला? सदर तरूणाला मारहाण का करण्यात आली? मारहाण करणारे तरूण कोण आहेत? या प्रश्नांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे नाव आता प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी!

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची राम कथेला हजेरी

केंद्र सरकारने ठरवले टॉमेटो विकायचे ५० रुपये किलो दराने!

अजित पवारांसमोरच कार्यकर्त्यांकडून गोंधळ !

लव्ह जिहादच्या घटना वाढत असल्याने लव्ह जिहाद विरोधी कठोर कायदा करण्यात यावा या मागणीने जोर धरला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक या राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात आला आहे. देशभरात अनेक ठिकाणी अशा हिंदू मुलींनी फसवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतरित करणे नंतर त्यांची हत्या किंवा त्यांना सोडून देण्याचे प्रकार होत आहेत. २०२२च्या अखेरपर्यंत देशभरात जवळपास १५३ अशा घटना घडल्या ज्यात लव्ह जिहादचा थेट संबंध होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा