झारखंडमधील बोकारो येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. केवळ तीन रुपयांसाठी महिलेचा हत्या करण्यात आली आहे. तर आईचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या तिच्या दोन लेकरांवर चाकूने वार करण्यात आले. मुलांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले असून, सध्या त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. सदर घटना ही झारखंड राज्यातील बोकोरा जिल्ह्यातिल चास पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तसेच आरोपींनी हत्या करून घटनास्थळांवरून पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत असून, पुढील प्रकरणाचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
केवळ ३ रुपयांच्या वादावरून ही हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी नजमा उर्फ लैला नावाच्या महिलेचा परिसरातील दुकानदार गुड्डू अन्सारी याच्याशी तीन रुपयांवरून वाद झाला. वादही मिटला, पण नंतर प्रकरण पुन्हा वाढले, तेव्हा गुड्डू अन्सारी आणि मोहम्मद झाकीर यांनी महिलेवर चाकूने अनेक वार केले. महिलेची दोन मुले मुमताज आलम आणि इम्तियाज आलम आईला वाचवण्यासाठी पुढे आले असता त्यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्या आता २४ तास
चित्रपट निर्माता कमल मिश्राने पत्नीला चिरडले
शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन
पोलिसांना हत्या झाल्याची माहिती मिळताच बोकोरा जिल्ह्यातील चास स्थानकातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळ गाठून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. तर चास पोलीस स्थानकाचे ठाणेदार मोहम्मद रुस्तम यांनी सांगितले की, जखमींचा जबाब नोंदवून, पोलिसांनी छापेमारी सुरु केली असून, आरोपींच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच घटना स्थळांवरून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.