27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरक्राईमनामालोकल रेल्वेत महिलेने दाखविलेल्या धाडसामुळे हल्लेखोर गेला पळून

लोकल रेल्वेत महिलेने दाखविलेल्या धाडसामुळे हल्लेखोर गेला पळून

Google News Follow

Related

मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधील महिलांच्या डब्यात चढलेल्या हल्लेखोरापासून आपल्या सहप्रवासी महिलेचा प्राण वाचवण्याचे धाडसाचे काम एका महिलेने केले. लोकल गाडी सिग्नलवर थांबली असता एक हल्लेखोर महिलांच्या डब्यात चढला आणि त्याने प्रवासी रेश्मा खातून (२१) यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना ओढत दरवाजापाशी आणले. हे पाहताच त्याच डब्यातील प्रवासी नीता भोसले यांनी लगेचच रेश्मा यांना दुसऱ्या बाजूने पकडून डब्यात ओढायला सुरुवात केली. त्यामुळे हल्लेखोर पळून गेला आणि नंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

बुधवारी (२२ सप्टेंबर) संध्याकाळी ७.१५ च्या सुमारास रेश्मा या लोकलमधील महिलांच्या दुसऱ्या श्रेणीतील डब्यातून प्रवास करत होत्या. पोईसरच्या नाल्याजवळ सिग्नल असल्यामुळे गाडी तिथे थांबली असता एक माणूस रेल्वे रुळांवरून त्यांच्या डब्यात चढला. त्याने जवळच उभ्या असलेल्या रेश्मा यांच्या खिशातून मोबाईल खेचला. त्यानंतर त्याने रेश्मा यांना मारून डब्याच्या दरवाजाजवळ खेचण्यास सुरुवात केली. त्याच क्षणी रेश्मा यांच्याशी काहीही ओळख नसतानाही त्यांना मदत करण्यासाठी नीता भोसले यांनी धाव घेतली.

ही वाचा:

अनिल परब ईडी समोर येणार?

पाकिस्तानचा दहशतवाद हाच चिंतेचा विषय

परदेशातील मित्रांच्या नावाने पैसे उकळण्याचा नवा मार्ग!

आरोग्य विभागाच्या महाभरतीचा महागोंधळ!

‘मी धावत जाऊन रेश्मा यांना पकडले आणि गाडीत आतल्या बाजूला खेचण्यास सुरुवात केली. तरीही हल्लेखोराने रेश्मा यांना सोडले नाही. आम्ही दोघीही मदतीसाठी ओरडत होतो, पण आश्चर्य म्हणजे तेव्हा डब्यातील कोणीही प्रवासी मदतीला आले नाहीत, त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती,’ असे भोसले यांनी सांगितले. काही क्षणांनी रेश्मा यांची सहकारी जी त्याच डब्यातून प्रवास करत होती ती आमच्या मदतीला धाऊन आली आणि प्रवाशांपैकी कोणीतरी आपत्कालीन साखळी खेचली. पण तोपर्यंत ट्रेन सुरू झाली होती आणि ट्रेन थांबलीच नाही, असेही भोसले यांनी सांगितले.

या सगळ्यामुळे हल्लेखोर बावरला आणि त्याने रेश्मा यांना सोडून देऊन तिथून पळ काढला. हल्लेखोराच्या हातात ब्लेड होता आणि त्यामुळे त्याने रेश्मा यांना इजा केली असती, अशी भीती मनात होती, असे नीता भोसले यांनी सांगितले. गाडी कांदिवली स्थानकात पोहचताच रेश्मा, नीता भोसले आणि काही इतर प्रवाशांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी बोरिवली आणि कांदिवली स्थानकांदरम्यानचा परिसर पिंजून काढून एका तासाच्या आत हल्लेखोराला अटक केली, असे लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले.

अटक करण्यात आलेला आरोपी प्रदीप जैस्वाल हा उत्तर प्रदेशमधून त्याच्या पालघरमधील त्याच्या काकाला भेटण्यासाठी आला होता. मद्यधुंद अवस्थेत त्याने हा हल्ला केला होता. चोरलेला मोबाईल बंद न केल्यामुळे त्याला शोधणे शक्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी नीता भोसले यांचे त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल कौतुक करून त्यांचा सत्कारही केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा