तांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेने पतीला ५९ लाखाला फसवले

जादूटोणा साठी समाजमाध्यमांचा वापर

तांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेने पतीला ५९ लाखाला फसवले

महाराष्ट्रात अजूनही अंधभक्त अंधश्रद्धेची वाट धरताना दिसत आहेत. अशीच एक घटना मुंबई येथील मरोळ भागात घडली आहे. या घटनेमध्ये कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी विवाहित महिलेने प्रियकरासह मित्राच्या मदतीने नवऱ्याची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पवई येथे घडेलेल्या या घटनेमध्ये विवाहित महिलेने भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाच्या आमिषाला बळी पडली व नवऱ्याचे वशीकरण करण्यासाठी ज्योतिषाने या विवाहित महिलेकडून ५९ लाख रुपयांच्या रोखरकमेसह सोन्याचे दगिने हडप करून फसवणूक केल्यामुळे या संदर्भात महिलेसह प्रियकर व मित्राविरुद्ध पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बादल शर्मा आणि परेश गडा अशी गुन्हा नोंदवलेल्या प्रियकर व तांत्रिक यांची नावे आहेत. तसेच या घटनेचे ३९ वर्षीय तकारदार हे पेशाने व्यावसायिक असून, अंधेरी मरोळ येथील मिलिटरी रोड परिसरात राहतात. प्रिंटिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रिंटर व कार्ट्रिजचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांच्या अंधेरी येथील एमआयडीसी परिसरात त्यांची एल. पी. कार्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. तक्रारदाराच्या पत्नीचे १२ वर्षा पूर्वी परेश गडा नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. हा प्रकार महिलेच्या नवऱ्याला समजतात त्यांनी आपसात बसून हे प्रकरण मिटवले होते.

मात्र या प्रकरणांमुळे नवरा-बायको यांच्यात सतत खटके उडत होते. नवऱ्याच्या या जाचाला कंटाळून या महिलेने कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनससाठी ३५ लाख रुपये घरी आणले होते. व त्याची माहिती त्याने आपल्या पत्नीला दिली होती. ५ दिवसांनंतर कपाटातील पैसे काढणीसाठी गेला असता कपाटातील पैसे गायब होते. पत्नीला विचारल्यास ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. पतीने महिलेला विश्वासात घेऊन विचारले असता कौटुंबिक वाद आणि अपमानास्पद वागणूक या त्रासाला कंटाळून या महिलेने इनस्टाग्राम वर भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांचा शोध घेतला.

हे ही वाचा:

तिकीट न मिळालेला आपचा नेता चढला ट्रान्समीटरवर

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल

टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू

दोन विमाने हवेतच एकमेकांवर आदळली आणि उसळला आगीचा डोंब

त्याने जादूटोणा करून पतीला वशमध्ये करता येईल असे सांगून विवाहित महिलेकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. ही सर्व घटना महीलेने मित्र व पूर्वीच्या प्रियकर परेश गडा याला सांगितली होती. परेशच्या मध्यस्थीमुळे महिला बादलच्या संपर्कात आली होती. त्यामुळे या महिलेने घरातील ३५ लाखांच्या रोकड सह ६० टोळे सोन सुद्धा देऊन टाकले. अशी कबुली तिने आपल्या पतीला दिली.

Exit mobile version