‘गिफ्ट’साठी महिलेने ठेवले दागिने गहाण आणि…

‘गिफ्ट’साठी महिलेने ठेवले दागिने गहाण आणि…

फेसबुकच्या माध्यमातून एका ५० वर्षीय विधवा महिलेची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने महिलेकडून तब्बल १३ लाख २९ हजार उकळले. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणातील सायबर गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

नेरूळ येथे राहणाऱ्या एका ५० वर्षीय विधवा महिलेने काही महिन्यांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून डॉ. मार्को नावाच्या व्यक्तीशी मैत्री केली होती. त्यानंतर मार्कोने या महिलेसोबत फेसबुकवरून चॅटिंग करण्यास सुरुवात केली. काही दिवसांत या दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. मार्कोने फेसबुकवरून महिलेची वैयक्तिक माहिती मिळवून तिला वाढदिवसाची भेट म्हणून सोन्याचे दागिने, घड्याळ, लेदर चप्पल, शूज, बॅग व रोख रक्कम ३७ लाख रुपये पाठविणार असल्याचे सांगितले. या सर्व वस्तूंचे फोटो, व्हिडीओ आणि कुरिअरची माहिती मार्कोने व्हाट्सअँपवर पाठवून दिली होती.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही

लीड्सवर भारत ‘लीड’ वाढवणार?

सीआयए-तालिबान दरम्यान गुप्त भेट

ॲपटले

या वस्तू कुरिअरने पाठवणार असल्याचे सांगून त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल, असे मार्कोने महिलेला सांगितले होते. त्यानंतर ऋषी झा नावाच्या व्यक्तीने महिलेला संपर्क करून गिफ्टचे कुरिअर पाठविण्यासाठी २९ हजार पाठवण्यास सांगितले, त्यानुसार महिलेने रक्कम पाठवल्यावर मार्कोने दिलेली ३७ लाखांची रक्कम डॉलरमध्ये असून भारतीय चलनात रुपांतरीत करण्यासाठी दीड लाख पाठवण्यास सांगितले. तसेच गिफ्टची रक्कम मोठी असून त्यासाठी सहा लाख ५० हजार पाठवण्यास सांगितले. ही सर्व रक्कम देताना महिलेने स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि मुलाच्या नावाने काढलेली एफडीसुद्धा मोडली.

त्यानंतरही एजंट जय शहा, सुमित मिज्ञा आणि ऋषी झा यांनी वेगवेगळ्या बहाण्यांनी महिलेकडून पैसे घेतले. अशा प्रकारे महिलेने एकूण १३ लाख २९ हजारांची रक्कम देऊनही कोणतेही गिफ्ट मिळाले नाही आणि त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले. या महिलेने नेरूळ पोलीस ठाण्यात सबंधित प्रकरणाची तक्रार नोंदवली.

Exit mobile version