व्हासटऍप व्हिडीओ कॉल आला आणि तरुण अडकला जाळ्यात

फेसबूकवरील फ्रेंड रेक्वेस्ट व्यावसायिकाला पडली भारी

व्हासटऍप व्हिडीओ कॉल आला आणि तरुण अडकला जाळ्यात

जगात आधुनिकतेचे वारे वाहत आहेत. मात्र या आधुनिकतेमुळे नव-नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुंतागुंतीचे प्रश्न मार्गी लागत आहेत. तंत्रज्ञानामुळे जेवढी प्रगती झाली आहे. तेवढीच चुकीच्या मार्गाने वापर केल्यास अधोगती सुद्धा पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना मुंबईतील मुलुंड परिसरातील एका व्यावसायिकासोबत घडली आहे. त्यामध्ये या व्यावसायिकाला सेक्स्टोर्शनच्या जाळ्यात अडकवून पैशांची मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित व्यवसायिकाने या घटने संबंधित मुलुंड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून मुलुंड पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुलुंड पश्चिमेला कुटुंबासोबत राहणारे ३५ वर्षीय तक्रारदार यांचा मेडिकल (उपकरण) डिव्हाईस बनविण्याच्या व्यावसाय आहे. १३ नोव्हेंबर रोजी दोन डॉक्टर मित्रांसोबत फिलीपिन्समधील बहरामद्धे कामानिमित्त गेला होता. याच दरम्यान १८ नोव्हेंबर रोजी तक्रारदार व्यावसायिकाला फेसबूकवर तरुणीचा मेसेज आला. तिने तक्रारदार व्यावसायिकाकडे व्हाटसअप नंबरची मागणी केली, मात्र तक्रारदार व्यवसायिकाने नंबर देण्यास साफ नकार दिला.

त्यानंतर व्यावसायिक तक्रारदाराला ऑनलाईन स्वरूपात सेक्स करण्यासाठी इंग्रजीत मेसेज केला असता या व्यावसायिक तक्रारदाराने तिला नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी व्यवसायिकाला आयुषी अग्रवाल या नावाने व्हासटऍप व्हिडिओ कॉल आला तरुणाने हा कॉल रेसिव्ह केला असता. समोर पूर्ण नग्न अवस्थेत एक महिला अश्लील चाळे करत होती व त्या महिलेने तरुणालाही नग्न होण्यास सांगितले. अश्लील चाळे बघून तरुणाने व्हिडिओ कॉल कट केला.

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरे गटाला पडणार पुन्हा खिंडार, कोण कोण जातंय?

अस्सलाम वालेकुम लाचारांनो, अतुल भातखळकरांनी डिवचले

बारसू रिफायनरीतून विविध टप्प्यांवर ५ लाख रोजगार निर्मिती

आसाम-मेघालय सीमेवर हिंसाचार, गोळीबारात ६ जणांचा मृत्यू 

त्यानंतर काही वेळातच फेकबूक मेसेंनजर वर एक व्हिडिओ पाठवण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये व्यावसायिक तरुणाचा आयूषी अग्रवाल या महिले सोबतचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करण्यात आला होता. त्यानंतर काही कालांतराने एक व्यक्तीचा कॉल आला व ४५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास फेसबूक व मेसेंजर हे हॅक केले असून, हा व्हिडिओ सर्वांना पाठवणार व पोलिसांत न जाण्यासाठी धमकावले. संबंधित प्रकार पाहता व्यावसायिक तक्रारदाराने मुलुंड पोलिस ठाणे गाठून या घटनेची तक्रार दिली आहे व पोलिसांनी सायबर गुन्ह्या अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील तपासणीसाठी सुरुवात केली आहे.

Exit mobile version