संदेशखालीचे वार्तांकन करणाऱ्या टीव्ही पत्रकाराला अटक

संदेशखालीचे वार्तांकन करणाऱ्या टीव्ही पत्रकाराला अटक

संदेशखालीतील महिलांवरील अत्याचाराचे वार्तांकन करणाऱ्या रिपब्लिक टीव्ही वाहिनीच्या पत्रकाराला गुरुवारी बंगाल पोलिसांनी जबरदस्तीने अटक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘बंगाल पोलिसांनी मला ताब्यात घेतले. संदेशखालीतील महिलांच्या मुलाखती घेत असताना मला त्यांनी अटक केली,’ अशी प्रतिक्रिया संतू पान यांनी दिली. ते रिपब्लिक बांगला या टीव्हीवाहिनीसाठी वार्तांकन करतात.

या प्रकरणी चित्रिकरण समोर आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांचा फौजफाटा या पत्रकाराला धक्काबुक्की करून आणि त्याच्याशी उद्धट वर्तणूक करत आहेत. तसेच, त्याला तिथून जबरदस्तीने नेले जात असल्याचेही यात दिसत आहे. ‘संदेशखालीमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. महिलांना व्यक्त करण्यास मज्जाव केला जात आहे,’ अशी माहिती विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी रिपब्लिक वाहिनीला दिली होती.

पान हे संदेशखालीतील या पीडित महिलांवरील अत्याचारांचा पाढा वाचत होते. पान हे तृणमूलचे मोठे नेते अभिषेक बॅनर्जी यांना सडेतोड प्रश्न विचारणारे पत्रकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आता सांतू पान याच्या अटकेला आता आव्हान दिले जाणार आहे. कोलकाता उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल कली जाईल, अशी प्रतिक्रिया रिपब्लिक टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी यांनी दिली.

हे ही वाचा:

भारतीय लष्करासाठी टाटा समूहाने बनवला उपग्रह

‘फारुख अब्दुल्ला मोदींना भेटत असत!’

अफगाणिस्तानात जिवंत लोकांचे फोटो काढण्यास मनाई

अखिलेश म्हणाले, जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतरच समाजवादी ‘न्याय यात्रेत’ सहभागी होईल!

तर,’ हा काळा दिवस आहे. हे खरोखरच लज्जास्पद आहे. अशा कृतीची ममतांना लाज वाटली पाहिजे. जनतेचा पाठिंबा गमावलेल्या नेत्याकडून अशी क्रूरता निर्माण होते,’ अशी प्रतिक्रिया बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी दिली. अटक करण्यापूर्वी संतू पान यांना तिथून हटवले जात होते. तेव्हा त्यांनी ‘मी माझे केवळ कर्तव्य बजावत आहे. मला का अडवले जात आहे? मला अटक करताय?,’ असे प्रश्न पोलिसांना विचारले होते.

Exit mobile version