पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची अत्याचार करून हत्या

पश्चिम बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याकडून सीबीआय चौकशीची मागणी

पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची अत्याचार करून हत्या

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्याच्या सरकारी रुग्णालयात (आरजी कार मेडिकल कॉलेज) पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा मृतदेह शुक्रवारी सापडला यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तरुणीचे डोळे, तोंड आणि गुप्त भागातून रक्तस्त्राव होत होता, अशी माहिती आहे. शिवाय तिच्या पोटावर, डाव्या पायाला, मानेला, उजव्या हाताला, ओठांना जखमा होत्या.

उत्तर कोलकत्यातील रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये या महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. पीडित महिला डॉक्टर ही फुफ्फुस निदान केंद्रामध्ये कार्यरत होती. ती गुरुवारी रात्री रुग्णालयामध्ये कामाला आली होती. कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीत बलात्कार करून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टर तरुणीच्या मानेचे हाडही तुटलेले आढळून आले. तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे समजते. या घटनेनंतर वैद्यकीय विद्यार्थी, भाजप, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. पश्चिम बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात पाठवले जाईल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सांगितले. दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार आहे. सीबीआय तपासाला हरकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा..

“मविआ काळात मला तुरुंगात टाकण्यासाठी काही अधिकाऱ्यांना सुपारी दिलेली”

आंदोलकांच्या दबावानंतर बांगलादेशच्या सरन्यायाधीशांचा राजीनामा

संजय राऊत हे पवारांची सोंगटी

भारतात आश्रय मिळविण्यासाठी बांगलादेशच्या सीमेवर हिंदू पाण्यात उभे

कोलकाता पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी संजय नावाच्या व्यक्तीलाही अटक केली आहे. त्या रात्री मुलीसोबत रुग्णालयात उपस्थित असलेल्या पाच जणांची चौकशी करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मुरली धर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०३ (१) आणि ६४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version