कुत्रा अंगावर पडून चिमुकलीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी कुत्र्याच्या मालकाला अटक

मुंब्रा येथील घटना; तीन जणांवर गुन्हा दाखल

कुत्रा अंगावर पडून चिमुकलीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी कुत्र्याच्या मालकाला अटक

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका पाच मजली इमारतीतून तीन वर्षीय मुलीवर कुत्रा पडल्यामुळे दुर्दैवाने त्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पीडित मुलगी ही तिच्या आईसोबत रस्त्याने जात असताना अचानक शेजारील बिल्डिंगवरून एक कुत्रा तिच्या अंगावर पडला. या घटनेत कुत्रा जखमी झाला तर मुलगीही बेशुद्ध पडली होती. पुढे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दरम्यान, या घटनेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या घटनेनंतर कुत्र्याच्या मालकाला अटक केली आहे तर, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेचे चित्रण झाले आहे. लोक रस्त्यावरून ये-जा करत आहेत. यादरम्यान ही मुलगीही तिच्या आईसोबत जात आहे. मुलगी पाच मजली इमारतीखालून जात असताना एक कुत्रा वरून खाली पडताना दिसतो, जो थेट मुलीवर पडतो. त्यामुळे मुलगी बेशुद्ध होते. त्याचवेळी कुत्राही खाली पडल्यानंतर काही वेळाने उठतो आणि जमिनीवरून उठून रस्त्याच्या कडेला जातो.

हे ही वाचा:

काकांची पुंगी निघाली नागोबा डूलाया लागला

‘नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचे मूर्तिमंत रूप’

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना १७ महिन्यानंतर जामीन

पॅरिस ऑलम्पिकमध्ये नीरज चोप्राला ‘रौप्य’ तर पाकिस्तानच्या अर्शदला ‘सुवर्ण’

ही घटना मुंब्रा येथील अमृत नगर परिसरात घडली. जैद सय्यद नावाच्या व्यक्तीने चिराग मॅन्शन इमारतीच्या टेरेसवर कुत्रा पाळला होता. मंगळवारी दुपारी हा कुत्रा पाचव्या मजल्यावरून एका तीन वर्षाच्या मुलीवर पडला. त्यामुळे मुलगी बेशुद्ध झाली. तिची आई ताबडतोब मुलीला रुग्णालयात घेऊन गेली. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमी मुजना यांनी जखमी कुत्र्याला तातडीने उचलून रुग्णालयात नेले. तसेच मुंब्रा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाला अटक केली आहे.

Exit mobile version