मुंबई महापालिकेचे गेल्या २५ वर्षांच्या ऑडिटसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करणार

उदय सामंत यांची घोषणा

मुंबई महापालिकेचे गेल्या २५ वर्षांच्या ऑडिटसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करणार

मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षाच्या कामाचे ऑडिट केले जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षातील अर्थिक व्यवहारांचे ऑडिट होणार आहे. यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. नियोजन, नगरविकास विभाग यांचे सचिव समितीमध्ये सहभागी असणार आहे. पुढील अधिवेशनात या संदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे.

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे गटाची २५ वर्ष सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली होती. मागील २५ वर्षात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाकडून सातत्याने करण्यात येत आहे. भाजपा आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागणीवर बोलताना मागणी केली होती. त्यानंतर ही माहिती देण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेत ८ नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यानच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून करण्यात आली होती. या सगळ्या अहवालामध्ये पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असे ताशेरे कॅगने आपल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या एकूण कारभारावर मारले होते.

हे ही वाचा :

विनय आपटे प्रतिष्ठानच्या लघुपट स्पर्धेचे निकाल जाहीर!

मध्य प्रदेशात भाजपाचे धक्कातंत्र; शिवराजसिंह चौहानांऐवजी मोहन यादवांची मुख्यमंत्रीपदी वर्णी

सर्वोच्च न्यायालयाच्या ३७० संबंधीच्या निर्णयाचा बॉलीवूडला आनंद

शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडा अन्यथा ठार करा!

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेवर यंदा कोणाची सत्ता येणार त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय. भाजपाने या निवडणुकीसाठी पहिल्यापासूनच कंबर कसली आहे. शिवाय एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थकही सोबत आहेत. मुंबई महानगरपालिकेवर सर्वांचेच लक्ष आहे. महापालिकेचे बजेटही मोठं आहे. गेल्या २५ वर्षांपासून या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती.

Exit mobile version