24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामासंसदेतील घुसखोरीप्रकरणात हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

संसदेतील घुसखोरीप्रकरणात हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

१३ डिसेंबर २०२३ रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान घुसखोरी करणाऱ्या सहा जणांना केली होती अटक

Google News Follow

Related

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात १३ तारखेला चार तरुणांनी संसदेची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला होता. यातील दोन जण संसदेत शिरले होते. तर, संसदेच्या बाहेरील आवारात दोघांनी घोषणाबाजी केली होती. आत घुसलेल्या दोघांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून उडी मारून धुराच्या नळकांड्या फोडत घोषणाबाजी केली होती. अचानक झालेल्या प्रकारामुळे संसदेतील खासदार भयभीत झाले होते तर देशालाही धक्का बसला होता. या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.

संसद सुरक्षा व्यवस्थेला सुरुंग लावल्याप्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तपास पूर्ण केला आहे. पटियाला हाऊस कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात जवळपास हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

या आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम १८६ आणि Unlawful Activity Prevention Act (युएपीए) कलम १३ अंतर्गत खटला चालविण्यासाठी अतिरिक्त, पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मंजुरी आवश्यक आहे. पोलीस या परवानगीची प्रतिक्षा करत असल्याची बाजू विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. हरदीप कौर यांनी अतिरिक्त दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी १५ जुलैपर्यंत कालावधी वाढवून दिला आहे. तोपर्यंत सहाही आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढविण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘ईव्हीएम’ जिवंत आहे की मेली?, मोदींचा इंडी आघाडीवर निशाणा!

एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!

पाकिस्तानविरोधातील अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार; सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण?

टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेकडून पाकिस्तानला पराभवाचा धक्का!

१३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेचे हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना अचानक दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभा सभागृहात उड्या घेतल्या होत्या. त्यातील एकाने धुराची नळकांडी फोडली होती. संसदेतील सदस्यांनी दोघा तरुणांना तात्काळ पकडले होते. हे तरुण दडपशाहीविरोधात घोषणा देत होते. तर संसदेबाहेर एक तरुण आणि तरुणीला सुरक्षा रक्षकांनी घोषणाबाजी करताना पकडले. पोलिसांनी याप्रकरणी मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे, नीलम आझाद, ललित झा आणि महेश कुमावत यांना अटक केली आणि त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा