महिला रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडली; आरोपीला जामीन नाकारला

आरोपीने जामीन मिळण्यासंदर्भात अर्ज केले असता, सत्र न्यायालयाने फेटाळले....

महिला रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडली; आरोपीला जामीन नाकारला

मुंबई लोकलमधील एका महिलेचा मोबाईल फोन चोरण्याचा प्रयत्नांत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेत जामीन मिळण्यासंदर्भात चोरट्यांनी अर्ज केला असता, सत्र न्यायालयाने या आठवड्यात आरोपी रमजान खान याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

आरोपीला भारतीय दंड संहिता कलम – ३९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा आहे. आरोपी रमजान खान जामीन अर्ज फेटाळताना, सत्र न्यायालयाने म्हटले आहे की, सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हे स्पष्टच असते की, चोरी करताना धावत्या ट्रेनच्या दारावर भांडण किंवा झटापटी केल्यास मृत्यू होऊ शकतो. हे माहित असून देखील आरोपीने हा गुन्हा केला.

४९ वर्षीय प्रियांका खोडके ११ एप्रिलला कामावरून घरी जात असताना, माहिम येथे चोराशी रेल्वेत झालेल्या झटापटीत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीने सांगितलेत होते की, संध्याकाळी ६:३९ च्या सुमारास महिला डब्यातून प्रवास करत असताना एका व्यक्तिने महिलांच्या डब्यात उडी मारताना पहिले. असे साक्षीदाराने पोलिसांना सांगितले. प्रथम मयत महिलेचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, दोघांमध्ये हाणामारीस सुरुवात झाली. पीडित महिला बचावासाठी बाहेर पडत असताना खाली पडली. तिच्या डोक्याला जबर मार लागल्याचे साक्षीदाराने सांगितले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे कारण देत फिर्यादी पक्षाने जामीन अर्जास नकार दिला.

हे ही वाचा:

म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी, या प्रकरणांचा तपास ईडीकडे

सुवर्णपदक हुकणाऱ्या पूजा गेहलोतला पंतप्रधान मोदींनी दिले प्रोत्साहन

नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदे काय बोलणार?

अग्रलेख लिहिणारे डुप्लिकेट संजय राऊत आहेत का?

साक्षीदाराने सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून चित्रफीत मिळवून, आरोपी घटनास्थळी दिसत असल्याचे सादर केले. आरोपीने दावा केला आहे की, मला ह्या प्रकरणात खोट्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. त्याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. असेही सांगण्यात आले आहे. आरोपी हा माहीमचा रहिवाशी असून घटनेवेळी त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. म्हणून आरोपी कडून पीडित महिलेचा मोबाईल चोरण्याची शक्यता नाही. केवळ संशया वरून अटक करण्यात आली आहे, असे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version